Home धाराशिव लोकप्रतिनीधी यांच्या गावात नेमकं चाललंय काय “

लोकप्रतिनीधी यांच्या गावात नेमकं चाललंय काय “

621

आशाताई बच्छाव

1001653995.jpg

“लोकप्रतिनीधी यांच्या गावात नेमकं चाललंय काय ”

धाराशिव उमरगा प्रतिनिधी: आज ” डॉक्टर डे ” आणि खरे पाहता डॉक्टरांचा आरोग्य सेवेचा गौरव करायचा दिवस. परंतु या क्षेत्रातील काही निसंग अधिकारी,कर्मचारी यांच्या गैर वर्तनूकीमुळे चांगले अधिकारी कर्मचारी बदनाम होत आहेत.मौजे डिग्गी ता.उमरगा. जि धाराशिव येथील हे प्राथमिक आरोग्य केंद्र 2019 ला चालू झाले.पण याचे उदघाट्न न होता चालू होणारे जवळपास पावणे तीन कोटी रुपये खर्चून बांधलेला हा दवाखाना आज धूळ खात पडलेला आहे.विद्यमान आमदार यांचे मुळ गाव असून तेथे ही अवस्था असून,अपुरे कर्मचारी अपुऱ्या सुविधा आरोग्य सेवेत सातत्य नसणे ,उगी फोटोशेसन साठी कामाकाज चालविणारे हे मजेशीर दवाखाना आहे की काय, अशी चर्चा सर्वत्र चालू आहे.आव जाव घर तुम्हारा.यामुळे या दवाखान्याची दुरावस्था झालेली आहे.दवाखान्यातील कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी बांधण्यात आलेली इमारत तर खूप बिकट अवस्थेत आहे.सध्या ती इमारत कुत्र्यांचे निवास्स्थान झाले आहे.यामुळे एवढा मोठा खर्च करून हा दवाखाना कर्मचाऱ्यांच्या मौज मस्तीचे केंद्र झाले आहे की काय असा प्रश्न उपस्थित होतो.लोकप्रतिनीधी यांच्या गावातील आरोग्य केंद्राची ही अवस्था असेल तर इतर गावांतील आरोग्य केंद्राची काय असेल असा सवाल उपस्थित केला जात आहे.