आशाताई बच्छाव
उद्या भारतीय स्टेट बँक शाखा वाशीम मध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
वाशीम, गोपाल तिवारी ब्युरो चीफ: भारतीय स्टेट बँकेच्या प्लॅटिनम ज्युबिली बँक स्थापना दिनाचे औचित्य साधून स्थानिक भारतीय स्टेट बँक शाखा वाशीम व सिव्हिल हॉस्पिटल वाशीम यांच्या संयुक्त विद्यमाने 27 जून रोजी सकाळी 9.30 वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय स्टेट बँक वाशीम शाखेत या शिबिराचे आयोजित करण्यात आले असून सिव्हिल हॉस्पिटल वाशीम यांच्याद्वारे रक्त संकलित करण्यात येणार आहे. तरी या शिबिराचा जास्ती जास्त रक्त दात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय सत्कार्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन शाखा व्यवस्थापक मोहित कुमार यांनी केले






