Home बुलढाणा आत्महत्या नसून हत्याच ! – स्व. पंकज देशमुख मृत्यूप्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्या!

आत्महत्या नसून हत्याच ! – स्व. पंकज देशमुख मृत्यूप्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्या!

66

आशाताई बच्छाव

1001635571.jpg

आत्महत्या नसून हत्याच ! – स्व. पंकज देशमुख मृत्यूप्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्या!
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :– बुलडाणा माझ्या पतीची हत्याच झाली असून या मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडी कडे द्यावा, अशी मागणी स्व. पंकज देशमूख यांच्या पत्नीने केली आहे. हीच मागणी उचलून धरत न्याय हक्क जन आंदोलन समिती जळगाव जामोदच्यावतीने पत्रपरीषद घेऊन जिल्हाधिकारी यांना आज निवेदन देण्यात आले.
आमदार संजय कुटे यांचे निकटवर्तीय असलेले स्वर्गीय पंकज देशमुख हे भाजपा कार्यकर्ता होते. तीन मे 2025 रोजी त्यांच्या वायाळ शिवारातील शेतात लहान झाडाला फाशी घेतली होती. मात्र स्थानिक पोलिसांनी या मृत्यूची चौफेर बाजूने तपासणी न करता एकतर्फी आत्महत्या असल्याचे पत्रकारांना सांगितले होते. मात्र स्वर्गीय पंकज देशमुख यांचे कुटुंब व नातेवाईक यांनी पंकज यांची हत्या झाल्याचे म्हटले आहे. दरम्यान आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येऊन या मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडी कडे द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Previous articleविरदेल येथे देवकर विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.
Next article१० लाखांच्या वादातून मेव्हण्याच्या खून प्रकरणी दोघां आरोपींना २६ जूनपर्यंत पोलिस कोठडी!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.