Home धाराशिव उमरग्याच्या सागर ॲग्रोटेकचा स्तुत्य उपक्रम: 35 जणाचे कंपनी स्थळी रक्तदान

उमरग्याच्या सागर ॲग्रोटेकचा स्तुत्य उपक्रम: 35 जणाचे कंपनी स्थळी रक्तदान

290

आशाताई बच्छाव

1001582112.jpg

उमरग्याच्या सागर ॲग्रोटेकचा स्तुत्य उपक्रम: 35 जणाचे कंपनी स्थळी रक्तदान

उमरगा:-  येथील महाराष्ट्र औद्योगीक परिक्षेत्रातील सागर ॲग्रोटेक कंपनीच्यावतीने  दि. 8 जुन रोजी कामगारा करीता तसेच परिसरातील जनतेकरीता रक्तदान शिबीसचे आयोजन करण्यात आले होते.  या शिबीरात 35  जणा पेक्षा जास्त जणांनी रक्तदान केले.विशेष म्हणजे कंपनीचे मालक गोविंद भाई पटेल यांच्यासह संपूर्ण परीवाराने रक्तदान केले. औद्योगिक परिसरात असा स्तुत्य  उपक्रम घेणारी एकमेव कंपनी आहे.
जकेकुर औद्योगिक परीसरात सागर ॲग्रोटेक कंपनी असून यांच्यामार्फत मागील तीन वर्षांपासून सातत्याने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येत असून, या शिबीरात स्वइच्छेने साधारण 35 जणानी रक्तदान केले. विशेष म्हणजे कंपनीचे मालक गोविंद भाई पटेल यांनी आज 36 वे रक्तदान केले त्यांच्या पत्नी मंजुलाबहेन पटेल यांनी 34 वे ,मुलगा किशन पटेल यांनी 11 वे रक्तदान केले. तसेच त्यांच्या परीवारातील इतर 5 सदस्यांनी रक्तदान केले .रक्तदान हे महादान असून, यामुळे एखाद्याला जीवनदान प्राप्त होत असल्यास रक्तदान करण्यात काही हरकत नाही.या भावनेतून गोविंद भाई पटेल यांच्यासह त्यांच्या गुजराती परीवाराच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते .
हे शिबीर यशस्वी करण्याकरीता राकेश पटेल, विष्णू माने,सचिन दोडतले,मतीन खान, रोहीत रेड्डी, अनिस,राहील पटेल, यांनी परिश्रम घेतले, श्रीकृष्ण रक्त केंद्र यांचे विजय केवडकर, राहुल कांबळे, रुतीक मात्रे, कृष्णा काळे, योगेश सोनकांबळे यांचा या शिबीरात सहभाग होता. या शिबीराकरीता प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर येथून आरती शुभम पटेल, शुभम दामोदर पटेल, जिनल दामोदर पटेल यांची विशेष उपस्थिती होती. सागर ॲग्रोटेक च्या या स्तुत्य उपक्रमाचे अनुकरण करून औद्योगिक परीसरातील इतर कंपन्यानी ही कामगारांना प्रोत्साहन देणारे विविध उपक्रम राबवावे अशी या क्षणी गोविंद भाई पटेल यांनी आपेक्षा व्यक्त केली.

Previous articleसमृद्धी महामार्गवर वाहनाचा अपघात, एका युवकाचा मृत्यू, तिघे जखमी अक्षर मानव संघटना धावली मदतीला. —
Next articleखडक माळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र मोफत आरोग्य तपासणी शिबिर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.