आशाताई बच्छाव
सुमेध बुद्ध विहार एकोडी येथे त्यागमूर्ती माता रमाई स्मृतिदिनी अभिवादन
संजीव भांबोरे
भंडारा -सुमेध बुद्ध विहार एकोडी येथे त्यागमूर्ती माता रमाई स्मृतिदिना निमित्ताने अभिवादन करण्यात आले.
सुरुवातीला महाकारूनिक तथागत भगवान गौतम बुद्ध, क्रांतीबा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमे समोर दिप प्रज्वलन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्याप्रसंगी एकोडी ग्रामपंचायत अधिकारी गौतम खंडाळे, तलाठी गंगाधर शिवणकर, ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले, कुंदा जांभुळकर, प्रबोधनकार मनोज कोटांगले, कैलास जांभुळकर, सचिव कार्तिक मेश्राम, मोहिनी कोटांगले, तन्वी कोटांगले,रुपेश कोटांगले, संदीप जांभुळकर उपस्थित होते.






