आशाताई बच्छाव
पवनी तालुक्यात वीज पडून दोघांचा मृत्यू, दोन जखमी
संजीव भांबोरे
भंडारा : पवनी तालुक्यातील खांबाडी शेतशिवारात आज (दि.२७) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास धान कापणी दरम्यान, एका हार्वेस्टर मशीनवर वीज कोसळल्याने दुर्दैवी घटना घडली. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत.
जिल्हा नियंत्रण कक्षाच्या प्राप्त माहितीनुसार, मृतांमध्ये कांता रमेश जीभकाटे (वय 55, रा. पिंपळगाव निपाणी, ता. पवनी, जि. भंडारा) आणि विजय सिंग (वय 40, रा. मथुरा, उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी अड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.
जखमींमध्ये संजय नामदेव गाडेकर (वय 47, रा. पिंपळगाव निपाणी, ता. पवनी) आणि महेश तेजा सिंग (वय 30, रा. मथुरा, उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे. दोन्ही जखमींना अड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.






