Home जालना संभाजी भिडे आणि सदावर्तेचा बोलवता धनी तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुघल सम्राट...

संभाजी भिडे आणि सदावर्तेचा बोलवता धनी तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुघल सम्राट औरंगजेबाला शक्य झाले नाही ते घडवण्याचा बालिश प्रयत्न

100

आशाताई बच्छाव

1001536861.jpg

संभाजी भिडे आणि सदावर्तेचा बोलवता धनी तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुघल सम्राट औरंगजेबाला शक्य झाले नाही ते घडवण्याचा बालिश प्रयत्न

मराठा, धनगर, बहुजन वाद वाढावा ही देवेंद्र फडणवीस प्रणीत चाल
समस्त बहुजन समाजाने सावध राहावे – डॉ. संजय लाखेपाटील

जालना (प्रतिनिधी दिलीप बोंडे) : संभाजी भिडे ऊर्फ मनोहर  कुलकर्णी  आणि गुणरत्न सदावर्ते यांचा बोलवता, कर्ता, करविता धनी तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असून साक्षात मुघल सम्राट औरंगजेबाला शक्य झाले नाही ते घडवण्याचा हा बालिश प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप करत मराठा, धनगर, बहुजन वाद वाढावा ही देवेंद्र फडणवीस प्रणीत चाल असून समस्त बहुजन समाजाने सावध राहावे असे आवाहन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव डॉ. संजय लाखेपाटील यांनी केले आहे.
या संदर्भात बोलतांना डॉ. संजय लाखे पाटील म्हणाले की, “या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ  पातशाह…मऱ्हाटा पातशाह एवढा छत्रपती जाहला, ही गोष्ट सामान्य झाली नाही..“ असे ज्याचे तत्कालीन सर्वदेशी इतिहासकारांनी वर्णन केले आणि ज्या घटनेने मृतप्राय तमाम हिंदू समाजात अक्षरशः नवचैतन्य संचारले अशी शेकडो वर्षातून घडलेलूली शिवराज्याभिषेक ही एकमेवाद्वितीय ऐतिहासिक जिवंत घटना असून 06 जून हा नेमानेच साजरा होणारा भारतवर्षातील एक सर्वोच्च आनंद सोहळा असून त्या पासून करोडो लोक, पिढ्यान्‌‍-पिढ्या लढावू वृत्ती, अचूक नियोजन, स्वातंत्र्य, स्वराज्य, रयतेचे राज्य आणि स्वाभिमान यांची प्रेरणा घेतात आणि हा सोहळा तिथी, तारीख अश्या वादात न पडता दररोज ही साजरा करण्यास व ह्रदयाच्या देव्हाऱ्यात पुजण्यासाठी सज्ज असतात. तोच राज्यभिषेक सोहळा सहेतुक तिथी आणि तारखेच्या वादात ओढून  आपल्या हुकूमी आणि पाळीव गुलाम अनुयायांना हाताशी धरून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कारस्थान करीत आहेत.