आशाताई बच्छाव
गोगाव येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी गडचिरोली सुरज गुंडमवार ब्युरो चीफ
आज गोगाव येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतांची पाहणी केली. शेतकरी आशिष रामचंद्र निजाम, जितेंद्र देवाजी चौधरी, आणि केवळराम हरी सालोरकर यांची भात पिके मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहेत.
या नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी करून नायब तहसीलदार यांच्यासोबत चर्चा केली. शेतकऱ्यांना लवकरात लवकर योग्य मोबदला मिळावा यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत.
शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे आहोत!
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री प्रशांतजी वाघरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारतजी खटी, मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणयजी खुणे, श्री. विलासजी खेवले, गडचिरोली नायब तहसीलदार श्री. नंदुजी प्रधान, मंडळ अधिकारी गडचिरोली श्री. रुपेशजी गोरेवार, तलाठी श्री.उदयजी वायकुळे व सहकारी उपस्थित होते.






