Home जालना जालना पोलीस अधीक्षक कार्यालयाने अवैध धंदयाविरूद्ध राबवली प्रभावी मोहीम

जालना पोलीस अधीक्षक कार्यालयाने अवैध धंदयाविरूद्ध राबवली प्रभावी मोहीम

159

आशाताई बच्छाव

1001458942.jpg

जालना पोलीस अधीक्षक कार्यालयाने अवैध धंदयाविरूद्ध राबवली प्रभावी मोहीम

जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके

जालना जिल्ह्यामध्ये दिनांक 18/ 04 /2025 दिनांक 30/04/ 2025 पावेतो अवैद्य धंद्याविरुद्ध मोहीम राबवण्यात आलेले होते सदर मोहिमेमध्ये अवैद्य धंद्यावर प्रभावीपणे अंमलबजावणी करणे कामी श्री अजय कुमार बंसल साहेब पोलीस अधीक्षक जालना व श्री आयुष नो साहेब अप्पर पोलीस अधीक्षक यांना यांनी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी अंमलदार यांना आदेशित केलेले होते.
त्यानुसार दिनांक 18 /04/2025 रोजी पासून ते दिनांक 30/04/2025 पावेतो अवैद्य धंद्यावर कारवाया करण्यात आल्या आहेत.सदर कालावधी मध्ये जालना जिल्ह्यात अवैद्य दारूच्या एकूण 235 केसेस करून 22,16,657/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून जुगाराच्या एकूण 56 केसेस करून 2,42,745/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच अवैद्य रेती कारवाई अनुषंगाने 19 केसेस करून 6,79,03,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच अंमली पदार्थ सेवनाच्या 4 कारवाया करण्यात आलेल्या असून 86 किलो गांजा 21,45,000/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.अवैद्य शस्त्र बाळगण्याच्या अनुषंगाने 03 केसेस करण्यात आलेल्या असून 81,100/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे गुटखा अनुषंगाने 03 कारवाई करून 13865000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशा एकूण 318 कारवाया करून गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. तसेच वाहनावर ब्लॅक फिल्मच्या एकूण 222 वाहनावर कारवाई करण्यात आलेल्या आहेत.
सदरची विशेष मोहीम ही श्री. अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक जालना व श्री आयुष नोपाणी अप्पर पोलीस अधीक्षक जालना यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली असून यापुढेही अशा मोहिमा वेळोवेळी जालना पोलीस दलातर्फे राबविण्यात येणार आहे.

Previous articleउरळ पोलीस स्टेशनची दयनीय अवस्था; पोलीस क्वार्टर्सही मोडकळीस
Next articleभोकरदन पंचायत समितीच्या प्रभारी गटविकास अधिकारी पदी महेंद्र साबळे यांची नियुक्ती
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.