Home पुणे भंडारा डोंगरावरील मंदिर कामासाठी विलास बालवडकर यांच्या तर्फे ५१ लाखाचा निधी

भंडारा डोंगरावरील मंदिर कामासाठी विलास बालवडकर यांच्या तर्फे ५१ लाखाचा निधी

77

आशाताई बच्छाव

1001457974.jpg

भंडारा डोंगरावरील मंदिर कामासाठी विलास बालवडकर यांच्या तर्फे ५१ लाखाचा निधी

गाथा चिंतन सोहळ्यात बालवडकर यांचा सत्कार

पुणे ब्युरो चीप: उमेश पाटील
भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष ह. भ. प. बाळासाहेब काशीद पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पुणे जिल्हा वारकरी महामंडळाचे अध्यक्ष विलास बालवडकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे होत असलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या भव्य मंदिराच्या निर्माण कामासाठी एक्कावन लाख रुपयांचा निधी दिला. या कार्याबद्दल पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांच्यावतीने बालवडकर यांचा सत्कार करण्यात आला.
वारकरी सेवा संघ पिंपरी चिंचवड शहर, सांगवी, पिंपळे गुरव, दापोडी, बोपखेल, फुगेवाडी, पिंपळे निलख ग्रामस्थ यांच्या वतीने जुनी सांगवीतील मारुती मंदिरात श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष व जगद्गुरू संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त आयोजित गाथा चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात विलास बालवडकर यांचा सत्कार करण्यात आला.
गाथा चिंतन सोहळ्यात ह.भ.प. सचिन महाराज पवार यांनी निरूपण केले. यावेळी अॅड पांडुरंग थोरवे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ह.भ.प. जालिंदर महाराज मोरे, ह.भ.प दिलीप महाराज मोरे, ह.भ.प. विक्रम महाराज मोरे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी राजाभाऊ चोपदार, गहिनीनाथ कळमक, अरुण पवार, महेश इंगवले, अशोक ढोरे पाटील, कुमार ढोरे, पारस ढोरे, बाळासाहेब शितोळे, राजेंद्र ढमाले, सौरभ शिंदे, वेदांत ढोरे, यश जाधव, सौरभ चव्हाण, तुकाराम भाऊ, राघव काटे आदी उपस्थित होते
यावेळी बोलताना अरुण पवार म्हणाले, जगदगुरू संत तुकाराम महाराजांची चिंतन भूमी असणाऱ्या श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर तुकोबारायांच्या आकाशाएवढ्या कार्याला साजेसे भव्य-दिव्य मंदिर उभे राहत असून, सकल वारकरी सांप्रदाय व तुकोबारायांवर नितांत श्रद्धा असणाऱ्या भाविकांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरत आहे. भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प. बाळासाहेब काशीद व पदाधिकारी स्वतः लक्ष घालीत आहेत. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भंडारा डोंगरावरील हे भव्य-दिव्य मंदिर निर्माणाचे पवित्र कार्य लवकरात लवकर पूर्णत्वास जावे, याकरिता वारकरी संप्रदायातील सर्व थोर कीर्तनकार, प्रवचनकार, महाराज मंडळी, तसेच तुकोबारायांवर नितांत श्रद्धा असणारे समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात कार्यरत असणारे सर्व लहानथोर या मंदिर निर्माणाच्या कार्याला मदत करीत आहेत. ह. भ. प. बालवडकर यांनी केलेली ५१ लाख रुपयांची मदत मोलाची आहे. दरम्यान, नवनिर्वाचित अध्यक्ष व सर्व विश्वस्तांचा सौरभ शिंदे आणि सांगवी ग्रामस्थ यांच्यावतीने सन्मान करण्यात आला.

Previous articleवालसा वडाळा गावातील शेतकऱ्यांचा मुलगा बनला क्लास वन अधिकारी
Next articleटेकेपार/माडगी येथे ग्रामस्तरीय हवामान अनुकूल आराखडा कार्यक्रम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.