आशाताई बच्छाव
वालसा वडाळा गावातील शेतकऱ्यांचा मुलगा बनला क्लास वन अधिकारी
जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
भोकरदन तालुक्यातील वालसा (वडाळा ) गावातील शेतकरी कुटुंबातील योगेश राऊत यांनी आई वडिलांचे कष्टाचे चीज करत MBBS पदवी मिळविली महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागत डॉक्टर योगेश राऊत यांची वैद्यकीय अधिकारी गट अ क्लास वन अधिकारी पदी निवड झाली आहे. त्यांच्या यशाने गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याची भावना व्यक्त केली जात आहे. श्री क्षेत्र वालसा येथील रमेश राऊत अल्पभूधारक शेतकरी असून दीड एकर शेती वेळ प्रसंगी मोलमजुरी करत त्यांनी एका मुलास इंजिनिअर तर दुसरा मुलगा वैद्यकीय अधिकारी बनवले आहे.योगेश सातवीपर्यंत गावात शिक्षण घेतले व तेथे परिस्थिती नसते तेथे निर्धार असतो. शेतकऱ्यांच्या क्षेत्रातील वाढलेली स्वप्न ही आसमान गाठू शकता आई-वडिलांची कष्ट मोठ्या भावाची प्रोत्साहन गुरुजनाची संस्कार आणि मित्राच्या सहकार्यामुळे यशस्वी झालो आहे अशी भावना योगेश राऊत यांनी व्यक्त केली.






