Home जालना पारध सह परिसरात चोरी सत्र सुरूच पारध पाठोपाठ मोहळाईतून बैल जोडी लंपास

पारध सह परिसरात चोरी सत्र सुरूच पारध पाठोपाठ मोहळाईतून बैल जोडी लंपास

137

आशाताई बच्छाव

1001457946.jpg

पारध सह परिसरात चोरी सत्र सुरूच पारध पाठोपाठ मोहळाईतून बैल जोडी लंपास

जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके

भोकरदन तालुक्यातील पारध बुद्रु येथील बैल जोडी चोरीची घटना ताजी असताना चोरट्यांनी पुन्हा धुमाकूळ घालत आहे .दुसऱ्याच दिवशी मोहळाई गावातून जनावरे चोरून खुले आवाहन दिले आहे. मोहाळाई येथील देवाजी देविदास पालकर यांची बैल जोडी तर भिका पालकर यांची एक गीरवासरी काल रात्री अज्ञात चोट्यांनी चोरून नेली एका पाठोपाठ घडलेल्या चोरीच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांमध्ये असुरक्षिततेचा भावना वाढली असून पोलिसाच्या कार्य क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे .पारध पोलिसांनी तातडीने याप्रकरणी लक्ष घालून चोरांना जेरबंद करावे अशी मागणी गावकऱ्यांची आहे पारध पोलिसांनी यापूर्वीच्या चोरीच्या तपास सुरू केला असतांना आता मोहाळाईतील या नवीन चोरीमुळे पोलिसांनी दबाव वाढला आहे. चोरट्यांनी एका मागे एक चोऱ्या करून पोलिसांसमोर अक्षरशः आव्हान निर्माण झाली आहे. आता पारध पोलीस या कोणत्या पद्धतीने पकडतात हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे या घटनेमुळे परिसरातील शेतकरी अधिक सतर्क झाले असून आपल्या जनावरांची सुरक्षा वाढवण्यासाठी विविध उपयोजना करत आहेत. मात्र पोलिसांकडून ठोस कारवाईची अपेक्षा शेतकरी वर्गातून तसेच पारध परिसरातून होतांना दिसत आहे.

Previous articleअक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर विहिरीचे भूमिपूजन करताना नंदा गजेंद्र लोखंडे. व इतर
Next articleविरदेल येथे उपसरपंच पदी श्रीमती वैजंताबाई यांची बिनविरोध निवड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.