आशाताई बच्छाव
चाळीसगाव परिसरात मोटारसायकल चोर्या करणारे नाशिक जिल्ह्यातील तिघांना जळगाव LCB ने केली अटक
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – चाळीसगाव परिसरात दुचाकी चोर्या करणारे नाशिक जिल्ह्यातील तिघांना जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे त्यांच्याकडून चोरीच्या चार दुचाकी देखील जप्त करण्यात आल्या असून या तिघा चोरट्यांना चाळीसगाव शहर पोलीसांच्या हवाली करण्यात आले. या चोरट्यांच्या अटकेमुळे चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाास माहिती मिळाली की, रेेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार भगवान उर्फ लंगड्या सिताराम करगळ रा. सोनगाव ता. मालेगाव हा त्याचे साथीदार आकाश गोविंद गायकवाड रा. जळगाव फाटा, निफाड व दादूु संजय सोनवणे रा. दरेगाव ता. मालेगाव हे दुचाकी वाहने चोरी करीत आहेत. त्यावरून पथकाने भगवान उर्फ लंगड्या याची माहिती काढली असता तो व आकाश गायकवाड हा जळगाव फाटा, निफाड येथे मिळून आले तर दादु सोनवणे हा दरेगाव येथे मिळून आला.
तिघांना ताब्यात घेऊ्न त्यांच्याकडील दुचाकींबाबत विचारपूस केली असता या तिघांनी चाळीसगाव परिसरातून चोरी केलेल्या तीन दुचाकी काढून दिल्या. या दुचाकी चोरीबाबत चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला दोन तर मेहूणबारे पोलीस स्टेशनला एक असे तीन गुन्हे दाखल आहेत. या चोरट्यांनी गुन्हा करण्यासााठी वापर केलेली दुचाकी देखील काढून दिली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी या चोरट्यांकडून 2 लाख 45 हजार रूपये किंमतीच्या 4 दुचाकी जप्त करून त्या ताब्यात घेतल्या व पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात घेतलेल्या चोरट्यांसह त्या चार दुचाकी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिल्या.
यातील आरोपी भगवान उर्फ लंगड्या सिताराम करगळ रा.सोनगाव ता. मालेगाव याच्यावर जळगाव, नाशिक, धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी दरोडा, जबरी चोरी, चोरीचे 13 गुन्हे दाखल असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा, जळगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी,चाळीसगावच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, हवालदार मुरलीधर धनगर, पोना. महेश पाटील, पोकॉ. भूषण शेलार, सागर पाटील, मिलींद जाधव, चालक पोलीस हवालदार दिपक चौधरी, भारत पाटील यांनी केली.