आशाताई बच्छाव
भंडारात तहसील कार्यालयासमोर तलाठी व मंडळाधिकारी यांचेएक दिवसीय धरणे आंदोलन
मागण्या पूर्ण न झाल्यास दिनांक 22 एप्रिल पासून बेमुदत रजा आंदोलन
संजीव भांबोरे
भंडारा -आज दिनांक 21 एप्रिल 2025 ला तहसील कार्यालय समोर भंडारा येथे तलाठी व मंडळ अधिकारी यांनी एक दिवशी धरणे आंदोलन सुरू असून त्या आंदोलनाला पत्रकार संजीव भांबोरे यांनी भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जिल्हाध्यक्ष शेखर ठाकरे यांच्याशी प्रत्यक्ष भेट करून त्यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
केले. त्यांच्या प्रलंबित असलेल्या मागण्या तलाठी व मंडळ अधिकारी यांची ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करणे ,तलाठी यांचे सीआर त्वरित देण्यात यावे, तलाठी मंडळ अधिकारी यांचे रिक्त पदे त्वरित भरण्यात यावे, तलाठी यांना त्यांचे कार्यालयीन भाडे देण्यात यावे, तलाठी व मंडळ अधिकारी यांना कालबद्ध पदोन्नती व तलाठी यांना स्थायित्व प्रमाणपत्र देण्यात यावे, 2021 चे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे अतिकालीन भत्ता देण्यात यावा, कालबाह्य झालेले प्रिंटर तसेच नवीन पदनिर्मित झालेले तलाठी व मंडळ अधिकारी यांना नव्याने लॅपटॉप व स्कॅनर प्रिंटर देण्यात यावे,शासकीय कार्यालयातील वीज बिलाचे देयकाची रक्कम देण्यात यावी, तलाठी व मंडळ अधिकारी यांची विनंती बदली करून देण्यात यावी, दिनांक 22 एप्रिल 2025 ला जिल्हाधिकारी कार्यालयास भंडारा येथे जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकारी यांचे एक दिवसीय मुदत रजा आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.भंडारा जिल्हा तलाठी व मंडळ अधिकारी यांनी घेतलेला आहे जनतेच्या कामांना दिलेरंगाई झाल्यास या शासन प्रशासन संपूर्ण जबाबदार राहील . भंडारा जिल्ह्यातील सर्व तलाठी मंडळ अ संगणकृतभंडारा जिल्ह्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी रजा आंदोलन करतील . अशी माहिती जिल्हा तलाठी शाखेचे अध्यक्ष शेखर एम ठाकरे, उपाध्यक्ष राजेश्वर ठाकरे, मंडळ अधिकारी जिल्हा शाखेचे अध्यक्ष जयंत सोनवणे, उपाध्यक्ष वसुंधरा वाचनिक ,तसेच सचिव टी आर गिरेपुंजे आंदोलन स्थळी उपस्थित होते.या व हे आंदोलन भंडारा जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यात संपूर्ण तलाठ्यांनी व मंडळ अधिकारी यांनी हिस्सा घेतलेला आहे.आंदोलन भंडारा जिल्ह्यात संपूर्ण तहसील नुसार आयोजित करण्यात आलेले आहे. या आंदोलनात राजेश मडामे महाराष्ट्र समन्वय महासंघ प्रतिनिधी यांनी सहभाग नोंदविला आहे.