Home बीड बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यामधील शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यामधील शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या

245

आशाताई बच्छाव

1001393444.jpg

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यामधील शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

 

बीड/पाटोदा दि. ०७ एप्रिल २०२५ रोजी वाटत तालुक्यातील डोंगर किनी अंतर्गत रायतेवाडीतील शेतकरी दत्ता संतराम रायते वय (४४) हे कर्जबाजारीपणामुळे चिंतेत होते याच निराशेतून राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना (दि.०७) सोमवारी उघडकीस आली. मयत शेतकरी दत्ता रायते चुंबळी शिवारात जळकेवाडी क्षेत्रात आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होते. शेती व ऊसतोडणी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असे नापिकी व कर्जबाजारी झाल्याने विवंचनेत होता. मुलांचे कसे होईल याच आशेवर जगत असलेला हे शेतकरी होता. याच वैफल्यातून त्यांनी सोमवार दि.०७ पहाटे घराच्या दरवाजाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळतात पाटोदा पोलीस घटनास्थळी धाव घेऊन सदरील घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाटोदा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेने रायते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.