
आशाताई बच्छाव
EXCLUSIVE! ‘आता माझी सटकली’ बायको माहेरी गेल्याने नवऱ्याने एसटीच्या काचा फोडल्या! काय आहे हा प्रकार.?
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :– बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वानखेड गावात एक अजब प्रकार घडला आहे. पत्नी माहेरी गेल्याच्या रागातून एका व्यक्तीने एसटीच्या काचा फोडल्या आहेत. माथेफिरूची पत्नी जवळपास पंधरा वर्षांपूर्वी त्याला सोडून माहेरी गेली होती. त्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याने अनेकदा पोलिसांकडे निवेदनही दिले. मात्र, बायको काही सासरी आली नाही. अखेर आज संतापलेल्या व्यक्तीने एसटीच्या काचा फोडत पोलीस प्रशासनाकडे आपली पत्नी परत आणवी, अशी विनंती केली.
प्रकाश पिंजरकर असे त्या व्यक्तीचे नाव आहे. या व्यक्तीचे पत्नीशी भांडण झाले होते. कडाक्याचे भांडण झाल्यानंतर ही महिला माहेरी निघून गेली. १५ वर्षांपूर्वीच महिला माहेरी निघून गेल्याची माहिती आहे. प्रकाशने अनेकदा पोलिसांकडे निवेदन दिले होते. पण पत्नी काही घरी परत आली नाही. अखेर आज प्रकाशचा संताप अनावर झाला. प्रकाशने संतापाच्या भरात एसटीच्या काचा फोडल्या. शेगाव – वानखेड या बसच्या मागच्या काचा फोडल्या आणि बसचे नुकसाने केले. तसेच पोलीस प्रशासनाने पत्नीला परत आणावी अशी विनंती केली. सध्या ही बस वानखेड गावात थांबली असून, पोलीस अद्याप घटनास्थळी दाखल झाले आहे या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. गावकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे. यावर प्रशासन काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचेच लक्षा लागले आहे.