Home बुलढाणा EXCLUSIVE! पोलिसाचा मर्डर ? गाडी लॉक, मृतदेह आत पोलिसाच्या हत्येने खळबळ !

EXCLUSIVE! पोलिसाचा मर्डर ? गाडी लॉक, मृतदेह आत पोलिसाच्या हत्येने खळबळ !

41
0

आशाताई बच्छाव

1001375196.jpg

EXCLUSIVE! पोलिसाचा मर्डर ? गाडी लॉक, मृतदेह आत पोलिसाच्या हत्येने खळबळ !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-देऊळगाव राजा जिल्ह्यात पुन्हा एकदा पोलिसाच्या संशयास्पद मृत्यूची घटना उघड झाली आहे. जालना पोलिस दलातील ज्ञानेश्वर पांडुरंग म्हस्के (वय ३८, गिरोली खुर्द, ता. देऊळगाव राजा) यांचा मृतदेह त्यांच्या स्वतःच्या स्विफ्ट डिझायर कारमध्ये आढळून आला. सदर घटना आज, ३० मार्च रोजी देऊळगाव राजा-सिंदखेडराजा रोडवरील आरजे इंटरनॅशनल स्कूलसमोरच्या वन विभागाच्या जागेत उघडकीस आली. म्हस्के यांचा मृतदेह गाडीतून आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. प्राथमिक तपासात गळा आवळून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे गाडी आतून लॉक होती, त्यामुळे हा घातपात की आत्महत्या याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून, अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही.
याच महिन्यात, २३ मार्चला अंढेरा पोलीस स्टेशन म्हस्के यांचा मृतदेह गाडीतून आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. प्राथमिक तपासात गळा आवळून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे गाडी आतून लॉक होती, त्यामुळे हा घातपात की आत्महत्या याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून, अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाहीं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here