Home नंदुरबार साक्री नंदुरबार रस्त्याच्या सुरू असलेल्या कामामुळे तरूणांचा अपघाती मृत्यू

साक्री नंदुरबार रस्त्याच्या सुरू असलेल्या कामामुळे तरूणांचा अपघाती मृत्यू

1285

आशाताई बच्छाव

1001374427.jpg

धुळे नंदुरबार संदीप वसंतराव पाटील ब्युरो चीफ -साक्री तालुक्यातून अत्यंत वाईट व दुर्भाग्यपूर्ण अपघात घटना घडल्याची बातमी समोर येत आहे. साक्री  ते नंदुरबार सुरू असलेले रस्त्याचे काम हे संथ गतीने सुरू असून वासदरेबारी मध्ये सुरू असलेल्या घाट रस्त्याचे काम दोन महिन्यापासून सुरू असून आत्तापर्यंत कित्येक अपघात झालेले आहेत व आत्तापर्यंत दोघांना जीवही गमावा लागलेला आहे वाजदरे बारी मध्ये सुरू असलेले काम अतिशय जीवघेण्या परिस्थितीत पर्याय मार्ग काढलेला आहे रस्ता सुरक्षा विषयक कुठलेही साधनाचा व नियमांचा वापर केलेला नाही समोरून दुसरे वाहन पास होत असताना जो मातीचा धूर उडतो त्याच्याने टू व्हीलर धारक याच नियंत्रण सुटून अपघात होत आहेत. ठेकेदार व शासनाचे याच्याकडे दुर्लक्ष आहे की काय.? कारण साईट पट्टीचे सुरू असलेले काम भरावासाठी टाकलेला मुरूम मातीचे ढीग याच्यातून उडणारा धूर रात्रीच्या वेळेस दुचाकी असो किंवा फोर व्हीलर याच्यासाठी त्रासदायक ठरत आहे वाहन चालकांना अंदाज येत नाही अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत साईट पट्टीसाठी टाकलेले मुरमाचे ढीग. आणि अपघाती घटना घडत आहेत अशीच घटना काल रात्री. कै . गौरव अर्जुन बोरसे वय वर्ष 22.राहणार खोरी तालुका साक्री जिल्हा धुळे.या तरुणाचा काल रात्री नऊ वाजता मातीचा धूर मुळेच टू व्हीलर वरचा ताबा सुटून मुरमाच्या ढीग वर जाऊन धडकला यामुळे गंभीर जखमी झाला. तातडीने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान सकाळी मृत्यू झाला.याला जबाबदार कोण अशी विचारणा जनता करत असून. सुरू असलेल्या कामात सेफ्टी विषयी आणि पर्याय मार्ग काढलेल्या मार्गाला कुठल्याही रस्ता सुरक्षेचे संसाधन दिलेले नाही याबाबत संबंधित ठेकेदार. यांच्यावर शासनाचे लक्ष आहे की नाही. अशी शंका उपस्थित होत आहे

Previous articleकर्करोग उपचारांसाठी चुंबकीय नॅनो कणांच्या निर्मितीसाठी पेटंट -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकांचे यश
Next articleEXCLUSIVE! पोलिसाचा मर्डर ? गाडी लॉक, मृतदेह आत पोलिसाच्या हत्येने खळबळ !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.