
आशाताई बच्छाव
सतगुरु जोग महाराज गुरुकुल निमगाव (पहेला) येथे आरोग्य तपासणी शिबिर व त्वचारोग आजारांवर व्याख्यान कार्यक्रम संपन्न
संजीव भांबोरे
भंडारा _तालुक्यातील पहेला येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या निमगाव येथे 31 मार्च 2025 रोज सोमवारला सकाळी 11 वाजता डॉ. संजय एकापुरे यांच्या सहकार्याने सद्गुरु जोग महाराज गुरुकुल निमगाव येथे विद्यार्थी व कर्मचारी यांच्या करिता आरोग्य शिबिर डॉ. हरिदास हटवार ,डॉ. संजय मानकर, (सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी )यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर घेण्यात आले. सर्वांची आरोग्य तपासणी व समुपदेशन करण्यात आले .त्यात वैयक्तिक स्वच्छता ,आहार विहार , ध्यानधारणा, योगा बद्दल माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ह. भ .प .चौधरी महाराज हे होते. यावेळी विद्यार्थी व कर्मचारी यांना औषधी व खाऊचे वितरित करण्यात आले .यावेळी ह. भ .प. चौधरी महाराज यांनी पाहुण्यांचे शाल ,श्रीफळ, प्रतिमा भेट देऊन आभार व्यक्त केले .यावेळी यशस्वी करण्याकरता रेवननाथ नेरकर ,सागर उजवणे ,डॉ. शशिकांत हजारे यांनी सहकार्य केले .यावेळी सर्व कर्मचारी व स्वयंसेवकांचे कार्यक्रम यशस्वी बद्दल आभार मानण्यात आले.