
आशाताई बच्छाव
टवाळखोरी! कानून कायद्यावर गांजाचा धूर ! – मंदिरा जवळच मुली -महिला असुरक्षित ! – उडाणटप्पूंवर कारवाई करण्याचे पोलिसांसमोर आव्हान!
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा कायद्याला न जुमानता काही नशाखोरी करणाऱ्या टवाळखोरांनी मूली-महिलांना टवाळक्या करीत जेरीस आणण्याचा प्रकार सुरू केल्याचे असुरक्षित चित्र जिजामाता नगरात दिसून येतेय. येथील प्रबोधन विद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या देवी मंदिर परिसरात हे टोळके धिंगाणा घालत असल्याची तक्रार ‘युवा मराठा ‘ला प्राप्त झाली आहे.
काही अपराधी मानसिकतेचे युवक व काही स्थानिक व्यक्ती यांचा प्रबोधन विद्यालयाच्या ठिय्या असतो. येथेच ते मद्यपान, गांजा सेवन करून धिंगाणा घालतात. मंदिरात पूजेसाठी येणाऱ्या महिलांवर अश्लील टिप्पणी देखील केली जाते. अपराधी मानसिकता पाहून महिलांना तत्वहीन वागणुकीचा सामना करावा लागत आहे. या टवाळखोरीमुळे महिला- मुलींना असुरक्षितता जाणवते. परिसरातील लोक चिंतीत असून, पोलिसांनी येथे नियमित गस्त घालून नशाखोरांची नशा उतरवावी आणि त्यांना चांगली अद्दल घडवून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.