आशाताई बच्छाव
आताची मोठ्ठी बातमी गुगल पे, फोन पे अचानक बंद? देशातील अनेक युजर्सनी केली तक्रार…
नवी दिल्ली: आज सायंकाळी साडेसहा ते पावणेसात वाजेच्या दरम्यान आँनलाईन पेमेंट साठी लोकप्रिय असलेले फोन पे व गुगल पे अँप अचानक बंद पडल्याने ग्राहकांत मोठी खळबळ उडाली.
आज अचानक आँनलाईन पेमेंटचे अँप बंद पडल्याने ग्राहक संभ्रमात पडले होते.आपले आँनलाईन अँप हँक झाले किंवा काय? या काळजीने बहुसंख्य ग्राहक धास्तावले होते.तर अनेकांनी याबाबत तक्रारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान हे वृत लिहीपर्यत दोघांही आँनलाईन अँपची सेवा सुरळीत झालेली नव्हती.