आशाताई बच्छाव
भारतीय जनता पार्टीची वाशिम शहरात अभूतपूर्व सदस्य नोंदणी
शहर प्रभारी अॅड. प्रदीप देशमुख यांची माहिती
वाशिम, गोपाल तिवारी ब्युरो चीफ- भारतीय जनता पार्टी संघटन पर्वा अंतर्गत सदस्य नोंदणी सध्या चालू आहे, या सदस्य नोंदणीचे वाशीम मंगरूळनाथ मतदार संघ प्रभारी आमदार श्याम खोडे आहेत. त्यांच्या नेतृत्वात शहरांमध्ये सदस्य नोंदणीला सुरुवात करण्यात आली होती. या सदस्य नोंदणीमध्ये शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक प्रयत्न करून व घरोघरी जाऊन शहरातील प्रत्येक बुथवर सदस्य नोंदणी केली. शहरात एकूण ६८ बूथ आहेत. त्यापैकी ६५ बुथवर ही नोंदणी करण्यात आली. शहरात बत्तीस हजार सदस्य नोंदणी करण्यात आली. हा आकडा वाशीम शहरातील एकूण मतदारांच्या जवळपास ५०% एवढा आहे. वाशिम मंगरुळनाथ मतदार संघाचे आमदार श्याम खोडे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या नोंदणीमुळे शहरात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची वातावरण आहे. शहरातील चौदा कार्यकर्त्यांनी एक हजाराच्यावर सदस्य नोंदणी केली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपले पत्र पाठवून या कार्यकर्त्यांचे विशेष अभिनंदन केले. आगामी काळात भारतीय जनता पार्टीचे संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने या सदस्य नोंदणीला विशेष महत्त्व आहे. येणार्या निवडणुकीमध्ये सुद्धा या सदस्य नोंदणीचा फायदा होणार आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी अथक प्रयत्न करून सदस्य नोंदणी केल्याबद्दल आमदार शाम खोडे यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.