आशाताई बच्छाव
खूनी थरार! – ७५ वर्षीय वृद्धाचा डोक्यात धारदार वार करून खून !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा:- लोणार शहरातील मंठा बायपास जवळील जैन ट्रेडस वर चौकिदाराचे काम करणाऱ्या ७५ वर्षीय वृद्धाचा डोक्यात धारदार वार करून खून केल्याची दुर्दैवी घटना ही १७फेब्रुवारी रोजी रात्रीदरम्यान घडल्याने एकच खळबळ उडाली. सदर घटना ही दि. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडीस आली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप
मिळताच उपावभागाय पालास आधकारा प्रदाप पाटील, ठाणेदार निमिष मेहत्रे हे पोलीस कर्मचाऱ्यांनसह तातडीने घटनास्थळावर हजर होऊन. पंचनामा केला.
मृतक बाबा मनसा पवार वय अंदाजे ७५ हे देवठाणा ता. मं ठा जी. जालना येथील रहिवासी असून लोणार येथील निलेश नवीन बेदमुथा यांच्या मंठा रोडवरील जैन ट्रेंडस वर चौकीदार म्हूणन काम करीत होते. रात्री दुकाना समोर नेहमी प्रमाणे पलंगावर झोपले असता त्याच्या डोक्यात धारधार वार करून खून केल्याचे उघडीस आले. खाली रक्त सांडले होते. मृतकाचे नातेवाईक आल्याने मृत्यूदेह शवविच्छेद नासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला होता. विशेष म्हणजे ज्या दुकानात हे मृतक चोकीदार म्हणून काम करत होते त्याचे नाव ही दुकानदाराना माहिती नसल्याचे दुकानदार सांगत होते. यावेळी घटनास्थलवर पीएसआय गणेश इंगोले, पोलीस कर्मचारी गणेश लोढे, नितीन खरडे, संजय जाधव, राहुल कायंदे, संतोष चव्हाण, सचिन घेवंडे यांनी पंचनामा केला व उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शन ठाणेदार निमिष मेहत्रे है करीत आहे.