आशाताई बच्छाव
आज कौळाणेत खंडोबा देवाची यात्रा, मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन
मालेगाव, (प्रतिनिधी प्रविण क्षीरसागर)
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात असलेल्या कौळाणे (निं) गावी आज दि.१२ रोजी माघी (दांडी) पौर्णिमेनिमित्त खंडेराव महाराजांच्या यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
चंदनपुरी येथील खंडोबा देवाची यात्रा संपल्यानंतर माघी पौर्णिमेला अर्थातच दांडी पौर्णिमेला यात्रेचे कौळाणे येथे आयोजन करण्यात येते.आज दि.१२ रोजी सकाळी चंदनपुरी येथून आणल्या जाणाऱ्या ज्योतीचे भव्य मिरवणूकीने स्वागत करण्यात येऊन गावाजवळील बरडयावर खंडेराव मंदीरात ज्योत नेऊन प्रज्वलित केली जाईल.तर उद्गुया गुरुवार दि.१३ रोजी गावी रात्री मनोरंजनपर तमाशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, यात्रा व्यशस्वीतेसाठी ग्रामस्थ मंडळी परिश्रम घेत आहेत.