आशाताई बच्छाव
महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेचे पदाधिकारी विविध मागण्याकरिता मंत्रालयात निवेदन
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)महामाया महिला सामाजिक न्याय संघटने तर्फे कलावंतांना न्याय मिळावा व त्यांच्या न्याय मागण्यासाठी निवेदन देण्याकरता मंत्रालयामध्ये भेट देण्यात आली महाराष्ट्र मंत्री आशिष शेलार यांनी निवेदन दिल्यानंतर सांगितले की
लोकनाट्य केंद्रावर डी .जे. तसेच व साउंड सिस्टीम सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त झाली आहे. या कला केंद्राचे काम अती व शर्तीनुसार होत नसेल तर जिल्हाधिकारी आणि पोलिसांनी योग्य ती कार्यवाही करावी. त्याचप्रमाणे महाराष्ट्र कला केंद्रांमध्ये लोकनाट्य व पारंपारिक लावणी शो मध्ये कलाकारांची कमतरता आहे. त्यासाठी नवीन कलाकार तयार व्हावेत यासाठी स्व.पद्मश्री श्रीमती यमुनाबाई वाईकर यांच्या नावे प्रशिक्षण सुरु करण्यात येणार आहे. यासह अन्य लोककलांची नावे पुरस्कार योजनाना देण्याबाबत विभागाने समाजातील जाणकारांच्या सूचना मागवाव्या असे ही मंत्री शेलार यांनी सांगितले.
लोक कलावंताच्या मागण्यावर आम्ही विचार करू असे सांगितले याप्रसंगी महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष वंदना लोणे, महाराष्ट्राचे अध्यक्ष शितलताई नागदेवे ,महाराष्ट्राचे संघटक मनीषा खोब्रागडे , महाराष्ट्र प्रवक्ता प्रनिता रामटेके महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रणिता वाहने, मनीषा भांडारकर , मृणाली कोल्हे, सुषमा वाघमारे, व इतर महिला मंत्रालयात भेट देण्याकरिता व निवेदन देण्याकरता भंडारा जिल्ह्यातून सामील झाल्या होत्या.