Home बुलढाणा पोलीस अधिकाऱ्याच्या शासकीय भूखंडावरील कथित अतिक्रमण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी

पोलीस अधिकाऱ्याच्या शासकीय भूखंडावरील कथित अतिक्रमण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी

111

आशाताई बच्छाव

1001208094.jpg

पोलीस अधिकाऱ्याच्या शासकीय भूखंडावरील कथित अतिक्रमण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी
युवा मराठा न्यूज बुलडाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा::-मोताळा तालुक्यातील कोथळी (पलढग) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील घटना शासकीय मालमत्ता क्रमांक १७८ वर पोलिस विभागातील कार्यरत कर्मचारी मनोहर सूपर्डा गोरे यांनी कथितरित्या बेकायदेशीर अतिक्रमण करून शासकीय भूखंड हडपल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील राजेंद्र ठोंबरे यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर प्रशासकीय निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे करण्यात आली आहे.
गावातील सार्वजनिक विकासकामांसाठी नियोजन करण्यात येत असून, अतिक्रमणमुक्ती मोहीम राबविण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. मात्र, या मोहिमेला पोलिस कर्मचारी गोरे व त्यांच्या पत्नी अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप अर्जदाराने केला आहे. गावातील अन्य अतिक्रमणधारकांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण हटवण्यास सहमती दर्शवली असताना, काही जण पोलिस कर्मचाऱ्याच्या मदतीने विरोध करत असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
यासोबतच, गोरे यांनी पोलिस विभागातील पदाचा गैरवापर करून शासकीय जागेवर बेकायदेशीर ताबा घेतल्याने, त्यांच्यावर त्वरित कठोर कारवाई करावी आणि त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. संबंधित भूखंडाचा दस्तऐवज (नमुना ८) तक्रारीसोबत जोडण्यात आला असून, यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयालाही निवेदन देण्यात आले आहे.
ग्रामस्थांनीही या प्रकरणात लक्ष घालून गावाचा विकास मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. आता पोलीस प्रशासन या तक्रारीवर काय भूमिका घेतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Previous articleपरिंचे गावात बांबू शेती कार्यशाळा व शेतकरी मेळावा संपन्न
Next articleहायवे क्र ५३ देतो अपघाताला आमंत्रण..! कंटेनर व आयशर मध्ये समोरा – समोर धडक मध्ये चारजण गंभीर जखमी..!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.