आशाताई बच्छाव
माहोरा येथील श्री.छत्रपती शिवाजी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा मध्ये वार्षिक स्नेह संमेलन संपन्न
जाफराबाद तालुका प्रतिनिधी-मुरलीधर डहाके
दिनांक 05/02/2025 सविस्तर वृत्त असे की
दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी श्री छत्रपती शिवाजी प्रा. व. मा. आश्रम शाळा, माहोरा येथे वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात आणि आनंदात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हापरिषद सदस्य मा. सौ. आशाताई मुकेश पाटील पांडे तसेच जिल्हापरिषद सदस्य मा.संतोष पाटील लोखंडे यांच्या हस्ते झाले. या वेळी या कार्यक्रमाला माजी पंचायत समिती सभापती साहेबराव मामा कानडजे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब जाधव, मा. पंचायत समिती सभापती चंद्रकांत चौतमल,माहोरा ग्रामपंचायत चे सरपंच श्री गजानन लहाने,संत ज्ञानेश्वर विद्यालय हसनाबाद चे प्राचार्य श्री माणिक दानवे सर, प्रा. आश्रम शाळा, धावडा चे मुख्याध्यापक श्री कौतिक खडके सर,सामाजिक कार्यकर्ते श्री दादाराव गडकरी,ग्रा. प. सदस्य कैलास लहाने, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री गंगाराम बोरसे ,हरिभाऊ जोशी सरपंच आदी सह विद्यार्थ्यांचे पालक, परिसरातील महिला पुरुष, तरुण मंडळी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमामध्ये विदयार्थ्यांनी वेगवेगळ्या गाण्यावर दर्जेदार आणि आकर्षक नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. श्रोत्यांनी देखील मोठ्या मनाने विदयार्थ्यांच्या कलेला दाद दिली आणि मोठ्या प्रमाणात रोख बक्षिसेही दिली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री संदीप सिनागरे सर,श्री देविदास देशमुख साहेब,श्री व्ही. के. चंदनशिव सर, श्री संदीप दांडगे सर,अधीक्षक श्री प्रताप दानवे सर,श्री मोरेश्वर उबाळे सर, श्री शिवाजी गायकवाड सर,श्री चरण कुटुंबरे सर, श्री दीपक वाघ सर,श्रीमती विद्या कड मॅडम, कु. अनुसया हांडगे मॅडम, श्री संजीव वाघ सर, सुनील डुकरे, माणिक दांडगे, लक्ष्मण चंदेल, शुभम पंडित, श्री दीपक बोरसे,श्री नारायण कळम,श्री गजानन वाघ,श्री पंडित डुकरे, परमेश्वर वाघ आदिनी परिश्रम घेतले.






