आशाताई बच्छाव
खुशालसिंग राणा ठाकुर यांच्या वाढदिवसानिमीत्त आयोजीत जिल्हास्तरीय फेंटबाल अजिंक्यपद स्पर्धा प्रचंड उत्साहात संपन्न
मुलांच्या गटात जिल्हा परीषद नेर तर मुलींच्या गटात कस्तुरबा गांधी बालीका विद्यालय बदनापुर अजिंक्य
जालना/प्रतिनीधी दिलीप बोंडे- माजी नगराध्यक्ष तथा जेष्ठ समाजसेवक व फेंटबाल असोसिएशन ऑफ इंडीयाचे अध्यक्ष खुशालसिंग राणा ठाकुर यांच्या वाढदिवसानिमीत्त आयोजीत तिसर्या जिल्हास्तरीय फेंटबाल अजिंक्यपद स्पर्धा अभुतपुर्व प्रतिसाद व प्रचंड उत्साहात संपन्न झाल्या.
स्पर्धेचे उदघाटन खुशालसिंग राणा ठाकुर यांच्या हस्ते करण्यात आले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष भास्कररावजी अंबेकर, विशेष उपस्थिती मध्ये कॉग्रेसचे महानगर अध्यक्ष शेख महेमुद, गणपती एज्युकेशन कॅम्पस राजुरचे ज्ञानेश्वर पुंगळे, देवगीरी इंग्लिश स्कुलचे अध्यक्ष बबन दादा सोरटी, माजी नगरसेवक जयंतराजे भोसले, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर ढोबळे, माजी नगरसेवक बाला परदेसी, समाजसेवक शेख ईब्राहीम, प्रा.डॉ. बप्पासाहेब म्हस्के यांची उपस्थिती होती, तर प्रमुख पाहुणे म्हणुन प्राचार्य जवाहर काबरा, डॉ. पोकळे साहेब, राजेंद्र परदेशी, अभय सेठ सहानी, शामभाऊ जवादे, ओमप्रकाश दायमा, संजय ठाकुर, अमोल ठाकुर युवा सेना जिल्हाध्यक्ष, मोहन इंगळे, सदाशीव वाघ, तुकाराम काकडे मु.अ. जि.प. प्रशाला नेर, प्रा. गायत्री सोरटी यांची उपस्थिती होतीे. कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन शेख चाँद पी.जे. यांनी केले.
स्पर्धेस जिल्हाभरातुन प्रचंड प्रतिसाद मिळाला यात सोळा शाळा व दोन स्पोर्टस क्लबचे 306 खेळाडु सहभागी झाले होते, यामध्ये प्रामुख्याने अंबड, बदनापुर, घनसावंगी, परतुर तसेच जालना शहर व जालना तालुक्यातील खेळाडुंचा सहभाग होता.






