आशाताई बच्छाव
11 जानेवारीला वाशिम मध्ये भव्य मुक मोर्चाचे आयोजन…
# स्व. संतोष देशमुख हत्या व सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ…
# सर्व पक्षीय, सर्व धर्मीय, सर्व जातीय समाज बांधव होणार सहभागी.
वाशिम, गोपाल तिवारी ब्युरो चीफ: –
मस्साजोग तालुका केज जिल्हा बीड येथील सरपंच स्व. संतोष देशमुख हत्या आणि परभणी येथिल सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी वाशिम येथे दी. 11 जानेवारी 2025 शनिवार रोजी सकाळी 11:00 वाजता भव्य मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करून मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे क्रूर हत्या करण्यात आली. अजूनही काही आरोपी पकडलेले नाहीत. या प्रकरणाची कायदेशिर सखोल चौकशी करून यामध्ये सामील असणाऱ्या सर्व आरोपींना तात्काळ अटक व्हावी व प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. यासाठी वाशिम जिल्ह्यातील सर्व पक्षीय, सर्व धर्मीय, सर्व जातीय समाज बांधवांच्या वतीने वाशिम शहरामध्ये दिनांक 11 जानेवारी शनिवार रोजी सकाळी 11 वा. स्थानिक छञपती शिवाजी महाराज चौक येथून पाटणी चौक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – देशमुख दवाखाना – अकोला नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम पर्यंत भव्य मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये स्व. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय, मुलगी वैभवी व मुलगा विराज देशमुख सुध्दा सहभागी होणार आहेत. तसेच बीड जील्हासह महाराष्ट्रातील अनेक लोक प्रतिनिधी, सामजिक संघटनाचे पदाधिकारी सहभागी असल्याची माहिती आहे.
तरी या मुक मोर्चामध्ये जिल्हयातील सर्व पक्षीय, सर्व धर्मीय, सर्व जातीय, सरपंच संघटना, सामजिक संघटना, तसेच समस्त समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन कऱण्यात आले आहे.