Home जालना माहोरा येथे श्री छत्रपती शिवाजी प्रा.व मा. आश्रम शाळा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई...

माहोरा येथे श्री छत्रपती शिवाजी प्रा.व मा. आश्रम शाळा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

207

आशाताई बच्छाव

1001115386.jpg

माहोरा येथे श्री छत्रपती शिवाजी प्रा.व मा. आश्रम शाळा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी
जाफराबाद तालुका प्रतिनिधी – मुरलीधर डहाके
साविस्तर वृत्त असे की माहोरा येथे दि. 3 जानेवारी वर शुक्रवार रोजी माहोरा येथील श्री छत्रपती शिवाजी प्रा. व. मा. आश्रम शाळा, माहोरा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ‘बालिका दिन ‘ म्हणून साजरी करण्यात आली. या वेळेस मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षकांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले . या प्रसंगी विद्यार्थिनींनी ज्योतिबा फुले तसेच सावित्रीबाई फुले यांचा वेष धारण केला होता. या वेळी विद्यार्थ्यांची भाषणे झाली. मुख्याध्यापक तसेच इतर शिक्षकांनी सावित्री बाईंचा जीवन परिचय तसेच त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी मुख्याध्यापक तसेच शिक्षक वृंद तसेच शाळेतील विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थीत होते.