आशाताई बच्छाव
येवता येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी
जाफराबाद तालुका प्रतिनिधी- मुरलीधर डहाके
दिनांक 03/01/2025
येवता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे दिनांक 3 वार शुक्रवार रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ‘बालिका दीन’ म्हणुन साजरी करण्यात आली.या प्रसंगी शिक्षिका श्रीमती एम.एस. चौतमोल,अंगणवाडी ताई श्रीमती अनिता दळवी,कृष्णाबाई तोंडे व विद्यार्थिनींच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी भक्ती केशव दळवी आणि दर्शना ज्ञानेश्वर दळवी या विद्यार्थीनींनी आपले मनोगत व्यक्त केले.श्री एस.एल.माळेकर सर यांनी सावित्रीबाई यांच्या जीवनाविषयी सखोल माहिती दिली.मुख्याध्यापक श्री विलास नवले सर, प्रदीप साळोक सर,विष्णु इंगळे सर, संजय मोरे सर, रामेश्वर पवार सर व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.






