Home भंडारा बोगस कामामुळे मुलांचा जीव मुठीत साकोलीत नविन इमारतीला प्रत्येक वर्गात पडले भेगा...

बोगस कामामुळे मुलांचा जीव मुठीत साकोलीत नविन इमारतीला प्रत्येक वर्गात पडले भेगा ; मग लहान मुल सुरक्षित कसे.?

123

आशाताई बच्छाव

1001092912.jpg

बोगस कामामुळे मुलांचा जीव मुठीत

साकोलीत नविन इमारतीला प्रत्येक वर्गात पडले भेगा ; मग लहान मुल सुरक्षित कसे.?

 

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) साकोली शहरातील सन २०२२ ला निर्मित जिल्हा परिषद हायस्कूल मागील शाळेच्या इमारतीला प्रत्येक वर्गात ओलावा टिकून तडे गेले आहेत. हा संतापजनक प्रकार गुरूवार ता. २५ डिसेंबरला येथे शालेय क्रीडा सत्राचा समारोप प्रसंगी लक्षात आला. तर अश्या बोगस व निकृष्ट दर्जाचे कामाने खरंच विद्यार्थी त्या भ्रष्ट इमारतीत सुरक्षित राहतील का.? असा संतप्त सवाल पालक जनतेने केला असून या बोगस शाळा इमारतीची चौकशी करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
साकोली शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल मागे सन २०२२ मध्ये प्रशस्त इमारत तयार झाली. सदर बांधकाम जिल्हा परिषद वतीने झाल्याचे बोलले जात आहे. पण या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य आणि बोगस कामाने गुरूवार २५ डिसेंबरला हा प्रकार निदर्शनास आला. येथील वर्ग ६ वा अ, ब, वर्ग ७ वा अ, ब खोलीत संपूर्ण भिंतींना वरून तडे जात आहेत. असा कोणताच वर्ग शिल्लक नाही की तेथे ओलावा व भेगा पडल्या नाहीत, मुख्य दरवाजा वरूनही भिंत क्रॅक होत आहे. पावसाळ्यात शाळेत नविन सत्र सुरू होते. येथे असंख्य लहान विद्यार्थी बसतात. जर ह्या अश्या बोगस कामाने वरील भाग कोसळून जीवितहानी झाली तर कोण जबाबदार.? तसे पाहिले तर शाळेतील प्रत्येक बांधकाम पारदर्शक व मजबूत व्हायला पाहिजे पण काही विभागातीलच बोगस ठेकेदारांना कमिशन जास्त लाटण्यासाठी वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी हे विद्यार्थ्यांच्या जीवाशी जीवघेणा खेळ मांडला आहे. या सदर इमारतीची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी पालकांनी केली असून लवकरात लवकर या इमारतीत जेथे जेथे निकृष्ट दर्जाचे कामाने तडे गेलेले आहेत ते पूर्णपणे व्यवस्थित आणि मजबूत बांधकाम करा अशी मागणी जनतेने केली आहे. येथील गटशिक्षणाधिकारी विजय आदमने यांनी लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीरपणे याची दखल घेऊन हा संतापजनक प्रकाराची चौकशी करण्याचीही मागणी पालकांनी केली आहे.

Previous articleअंबाजोगाई तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम बोगस कोट्यावधींचा पैसा गुत्तेदाराच्या खिशात
Next articleकेंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे शनिदर्शन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.