Home बीड अंबाजोगाई तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम बोगस कोट्यावधींचा पैसा गुत्तेदाराच्या...

अंबाजोगाई तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम बोगस कोट्यावधींचा पैसा गुत्तेदाराच्या खिशात

156

आशाताई बच्छाव

1001092850.jpg

अंबाजोगाई तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम बोगस कोट्यावधींचा पैसा गुत्तेदाराच्या खिशात

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड/अंबाजोगाई दि.२८ डिसेंबर २०२४ रोजी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात घाटनांदुर येथील जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या बोगस कामाची मर्यादा ओलांडली आहे. सदरील कामात पाईपलाईन योजनेसाठी केंद्र शासनाकडून करोडो रुपयांचा निधी आलेला आहे, हे खरं पण गुत्तेदार आपल्या जवळील व्यक्तींना हाताशी धरून हे पाईपलाईनचे काम बोगसरीत्या करत असून पाईपलाईनचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. तरी या कामाची केंद्रीय स्तरावरून तात्काळ चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे. बीड जिल्ह्यातील संबंधित अधिकारी या कामाकडे लक्ष देतील का? असे सामान्य नागरिक आपले मत व्यक्त करत आहेत. गुत्तेदार, कर्मचारी आणि सर्वसाधारण जनतेच्या नावावर निवडून आलेले राजकीय पक्षाचे पुढारी याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देतील का? असे यावरून दिसत आहे. अंबाजोगाई तालुक्यात नव्हे तर देशात चालू असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत कामांचा केंद्रीय पथकाकडून तपासणी कर्तव्यदक्ष अधिकार्यांनी या कामाची पाहणी करावी अशी घाटनांदुर गावातील नागरिक मागणी करत आहेत. हे काम इस्टिमेट प्रमाणे झालेले दिसून येत नाही. प्रशासनाला याची माहिती होऊ न देता हे गुत्तेदार आपल्या थोड्याशा मोबदल्यामुळे करोडो रुपयांच्या योजना बोगस करत आहेत. घाटनांदुर येथील जलजीवनचे काम होत असलेल्या कामावरून दिसून येत आहे. शंकर विद्यालय, मदिना नगर, सोमेश्वर विद्यालय, सबस्टेशन कॉलनी, बौद्ध वस्ती व अच्युत मिसाळ यांच्या घराजवळ एक ते दीड फुटावर पाईपलाईनसाठी खोदलेले खोदकाम दिसत असून सदरील पाईपलाईनसाठी दोन ते अडीच फूट खोल खोदलेले खोदकाम खोदकाम आवश्यक असते परंतु संबंधित गुत्तेदार हे केंद्र व महाराष्ट्र शासनाची मोठ्या प्रमाणात फसवणूक करत बोगसगिरीचे काम करून त्यातून मिळणारा पैसा ते आपल्या खिशात भरत आहे. या गुत्तेदारावर कोणाचे नियंत्रणही दिसत नाही, गुत्तेदाराचा मनमानी कारभार चालू झालेला दिसून येत आहे. तरी याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन हा प्रकार इथेच थांबवावा व यात दोषी असणाऱ्या संबंधितावर शासनाने योग्य कार्यवाही करावी. अशी समस्त घाटनांदुर ग्रामस्थांची मागणी आहे.