आशाताई बच्छाव
बीड जिल्ह्यात जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासन राजकीय पक्षांच्या दावणीला
मोहन चव्हाण
उपजिल्हा प्रतिनिधी बीड
बीड दि.२७ डिसेंबर २०२४ बीड जिल्ह्यातील भ्रष्टाचार आणि वाढलेली गुन्हेगारी याला जबाबदार कोण असा प्रश्न सामान्य जनतेतून येत आहे. जिल्ह्यातील वाढलेली गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराला राजकीय पक्ष राजकीय पक्षातील गुंड आणि गुन्हेगारी क्षेत्रातील राजकीय नेते पुढारी पदाधिकारी मंत्री जबाबदार असून जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन हे राजकीय पक्षांच्या दावणीला बांधले असल्याचे मत सर्व सामान्य जनतेतून येत आहे.
गेल्या काही वर्षांत बीड जिल्ह्यातील राजकीय समीकरणात आणि शासन, प्रशासन यांच्यात खुप मोठे बदल झालेले दिसून येतात. बीड जिल्ह्यातील भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांचा प्रवेश बीड जिल्ह्यातील राजकारणात झाला असून या राजकीय पक्षातील राजकीय गुंडामुळे आणि जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन यांच्या संगनमताने बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था वेशीला सांगण्याचा प्रयत्न चालू आहे. बीड जिल्हा प्रशासनातील काही उच्च पदांवरील अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस खात्यातील अधिकारी कर्मचारी तर राजकीय पक्षातील नेते आणि पुढारी यांच्या दावणीला बांधलेले दिसत असल्याचे मत जिल्ह्यातील सामान्य जनतेतून येत आहे. गत पाच ते दहा वर्षांत बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात भर दिवसा अन्याय, अत्याचार, चोरी, दरोडे, हत्या, अपहरण, जातीयवादी स्त्रीयांवर होणारे अत्याचार अशा अनेक घटानांनी जिल्हा होरपळत असताना राजकीय पक्षातील नेते पुढारी पदाधिकारी असे गुन्हे करणाऱ्यांना पाठीशी घालताना दिसतात. तसेच अशा घटनांना बीड जिल्ह्यातील जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी अशा घटनांची नोंद न घेता जिल्ह्यात जात बघुन गुन्हा दाखल करणे किंवा राजकीय पक्षातील नेत्यांचा फोन आला की घटनांकडे दुर्लक्ष करून गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे काम करत असल्याने सर्व सामान्य माणसाला न्याय आणि हक्कांसाठी कोणाकडे जावे असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. राजकीय पक्षातील गुंड प्रवृत्तीच्या नेत्यांना आणि त्यांच्या गुंडांना पाठीशी घालून मोठं मोठे गुन्हे करण्यासाठी बीड जिल्ह्यातील पोलिस प्रशासनाकडून मोठी मोहीम राबवली जात आहे. सामान्य नागरीकांना वेठीस धरून गावगुंडांना मोकाट सोडणारे पोलिस प्रशासन बीड जिल्ह्यातील वाढलेली गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार याला मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे. या घटनांमध्ये बीड मधील जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांचा सिंहाचा वाटा असून जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था वेशीला टांगण्याचे काम बीड जिल्ह्यातील पोलिस प्रशासनाकडून होताना दिसते.