आशाताई बच्छाव
बीड जिल्ह्यातील सर्व बंदूकांचे लायसन रद्द होणार पोलिसांच्या कारवाईला आली गती
मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा
बीड दि.२७ डिसेंबर २०२४ केज तालुक्यातील मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांना बेदम मारहाण करून खुन करण्यात आला. यामुळे पूर्ण महाराष्ट्रात बीड जिल्हा चर्चेत आहे, परंतु याच बीड जिल्ह्यामध्ये १,२२२ बंदुकीचे परवानाधारक आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बीड जिल्ह्यात पाच ते सहा पट बंदुकीचे परवानाधारक आहेत. त्यामुळे तात्काळ परवाना धारकांची पूर्णतपासणी करण्यात यावी आणि तातडीने बंदुकीचे लायसन्स रद्द करावे अशी मागणी करण्यात येत आहे. सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण प्रचंड तापले आहे. या प्रकरणात वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोपांच्या फैरी झडत आहेत. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील पोलीस दल वेगाने कामाला लागले आहे. दि.२५ गुरुवार रोजी सीआयडी चे महासंचालक केजमध्ये आले होते. त्यांनी बीड जिल्ह्यातील प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांशी तब्बल चार- साडेचार तास चर्चा केली. त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांशी या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली. याशिवाय बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवंत यांनी देखील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात विशेष लक्ष घातले आहे. या संपूर्ण प्रकरणात हत्या, ॲट्रॉसिटी आणि खंडणी असे विविध गुन्हे दाखल करण्यात आले असून या सगळ्याचा तपास सीआयडी करणार आहे. यानंतर जिल्ह्यातील गुंडगिरी आणि बंदूक धारक ही चर्चेत आले आहेत. या दरम्यान कैलास फड नामक आरोपीचा हवेत फायरिंग केलेला व्हिडिओ समोर आला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे. बंदुकीची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे, हे लायसन्स रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे.