Home नाशिक डीसीसी,नाशिक संघाने पटकावला शारदा व्हॉलीबॉल चषक

डीसीसी,नाशिक संघाने पटकावला शारदा व्हॉलीबॉल चषक

67

आशाताई बच्छाव

1001090852.jpg

डीसीसी,नाशिक संघाने पटकावला शारदा व्हॉलीबॉल चषक

भरत पवार स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू!!!

कोपरगांव, दिपक कदम तालुका प्रतिनिधी: येथील सोमैया विद्या विहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या सुवर्ण महोत्सव निमित्ताने आयोजित केलेल्या १६ वर्षाखालील मुलांच्या व्हॉलिबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात डीसीसी,नाशिक संघाने राहता स्ट्रायकर्स संघाचा २-० ने पराभव करून शारदा व्हॉलिबॉल चषक पटकावला.
श्रीरामपूर,राहता,कोपरगाव, नेवासा,ओझर,नासिक आदी ठिकाणाहून १२ उत्कृष्ट संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता.या स्पर्धेतील पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये राहता स्ट्रायकर्स संघाने अष्टविनायक ओझर संघावर रंगतदार झालेल्या सामन्यांमध्ये १५-१२,०८-१५ व १५-१३ ने मात करून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत बलाढ्य डीसीसी नाशिक संघाने सेंट मेरी नेवासा संघावर १५-११ व १५-१२ ने मात करून अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामन्यांमध्ये बलाढ्य डीसीसी संघाने राहता स्ट्रायकर्स संघाचा सरळ सेटमध्ये २५-१७ व २५-१८ने पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. स्पर्धेमध्ये आक्रमक खेळ करणारा नाशिकचा भरत पवारला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
स्पर्धेचे पंचप्रमुख म्हणून नितीन बलराज,तर स्पर्धेचे पंच म्हणून धनंजय माळी,भूषण माळी, आर्यन उपाध्ये व आदित्य पटारे यांनी काम पाहिले.विजेत्या संघांना शाळेचे प्राचार्य श्री के एल वाकचौरे, क्रीडा मार्गदर्शक श्री राजेंद्र कोहकडे,उपप्राचार्या सौ शुभांगी अमृतकर,पर्यवेक्षिका सौ प्रज्ञा पहाडे, सौ पल्लवी ससाणे, सौ नैथिली फर्नांडिस,क्रीडा प्रमुख श्री धनंजय देवकर,श्री शिवप्रसाद घोडके तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

*स्पर्धेचा अंतिम निकाल*

#विजेता: डीसीसी,नाशिक ₹ ५०००/- चषक व प्रमाणपत्र.

#उपविजेता: राहता स्ट्रायकर्स ₹ ३०००/- चषक व प्रमाणपत्र.

#तृतीय_क्रमांक : सेंट मेरी स्कूल नेवासा ₹ २०००/- चषक व प्रमाणपत्र.

#चतुर्थ_क्रमांक: अष्टविनायक ओझर ₹ १०००/- चषक व प्रमाणपत्र.

Previous articleतेजस्विनी( मशाल) देवभूमी उजळवण्यासाठी निघाली,मशाल राज्यातील सर्व १३ जिल्ह्यात ३८२३ किलोमीटरचा प्रवास करेल.
Next articleप्रधानमंत्री बीमा सखी योजनेत “बीमा सखी भरती” शिबीर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.