Home बुलढाणा शाब्बास पोलिसांनो! एसपींची जिल्हा पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप ! – सरत्या वर्षात...

शाब्बास पोलिसांनो! एसपींची जिल्हा पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप ! – सरत्या वर्षात लावला गहाळ 382 मोबाईलचा शोध ! – आज स्थानिक गुन्हे शाखेने केले 71 मोबाईल मुळ मालकांना परत !

66

आशाताई बच्छाव

1001089578.jpg

शाब्बास पोलिसांनो! एसपींची जिल्हा पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप ! – सरत्या वर्षात लावला गहाळ 382 मोबाईलचा शोध ! – आज स्थानिक गुन्हे शाखेने केले 71 मोबाईल मुळ मालकांना परत !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीत गहाळ झालेल्या मोबाईलच्या
तक्रारीचे प्रमाण वाढले. महागडे अँन्ड्राईड मोबाईल गहाळ झाल्याने व पोलिस तपास संथगतीने होत असल्याने नागरिक हैराण झाले होते. दरम्यान जिल्हा पोलिसांनी सरत्या वर्षात मोहीम राबवून 382 मोबाईलचा शोध लावला तर 71 मूळ मालकांना मोबाईल परत करण्यात आले आहेत. दरम्यान एसपी विश्व पानसरे यांनी या कामगिरी बाबत जिल्हा पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक, बुलढाणा बी. बी महामुनी, अपर पोलीस अधीक्षक, खामगाव अशोक थोरात यांच्या आदेशाने सदर मोहीम राबविण्यात आली. महत्वाची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक
अशोक लांडे यांना देण्यात आली होती.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांनी स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा येथील सफौ गजानन माळी, पोकॉ. जयंत बोचे, अमोल शेजोळ व TAW (सायबर लॅब), बुलढाणा येथील पोहेकॉ पवन मखमले व कैलास ठोंबरे यांचे पथक गठीत केले होते. मागील 3 महीन्यामध्ये जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरून 9,23,000 किमतीचे 71 गहाळ मोबाईलचा या पथकाने शोध लावला आहे. हस्तगत केलेले हे मोबाईल संबंधीत मुळ मालकास परत केले आहे तसेच यापूर्वी एलसीबीने 169 व विविध पोलीस स्टेशन स्तरावरून 152 असे 382 मिसिंग मोबाईलचा शोध घेऊन मूळ बालकास सुपूर्त केलेले आहे.

Previous articleनियम ! एकदा विकलेली वस्तू परत घ्यावी लागणारच ! – दुकानदार येतील वठणीवर !
Next articleअकोला येथील युवक -युवती संमेलनासाठी प्रा. राजेंद्र वैद्य यांचे मार्गदर्शक म्हणून निवड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.