Home गडचिरोली गडचिरोली जिल्हाधिकारी म्हणून अविश्यांत पंडा यांनी पदभार स्वीकारला

गडचिरोली जिल्हाधिकारी म्हणून अविश्यांत पंडा यांनी पदभार स्वीकारला

92

आशाताई बच्छाव

1001087756.jpg

गडचिरोली जिल्हाधिकारी म्हणून अविश्यांत पंडा यांनी पदभार स्वीकारला
टीम भावना जोपासून काम करण्याचे आवाहन

गडचिरोली दि.26, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ: गडचिरोली जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून अविश्यांत पंडा यांनी आज जिल्हाधिकारी संजय दैने यांचेकडून पदभार स्वीकारला. श्री दैने यांनी त्यांचे स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या. अपर जिल्हाधिकारी विवेक घोडके, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील, उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) तसेच इतर विभागप्रमुख यांनीदेखील श्री पंडा यांचे स्वागत केले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी पंडा यांनी जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्याच्या सूचना विभाग प्रमुखांना दिल्या. गडचिरोली जिल्ह्यात विकास कामांसाठी मोठा वाव आहे. ही कामे करण्यासाठी मिळालेल्या संधीचा उपयोग करून प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे आणि भविष्यातील योजनांचे नियोजन करणे आवश्यक आहे, असे सांगून त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना टीम भावना जोपासून काम करण्याचे आवाहन केले.
श्री. अविश्यांत पंडा हे 2017 च्या आयएएस बॅचचे अधिकारी असून यापूर्वी त्यांनी नंदुरबार येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी, अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच नागपूर येथे वस्त्रोद्योग आयुक्त म्हणून कार्य केले आहे.
माजी जिल्हाधिकारी संजय दैने यांची बदली नागपूर येथे वस्त्रोद्योग आयुक्त या पदावर झाली आहे.

Previous articleभारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास
Next articleसरपंच संतोष देशमुख यांना अमानुष पणे मारहाण करून हत्या करणाऱ्यावर कठोर कारवाई करा,
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.