आशाताई बच्छाव
खाकी फायर है! ‘एसपींच्या नेतृत्वात सहा कोटी 98 लाख 73 हजार 3002 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत !’
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा अवघ्या तीन महिन्यापूर्वी पदभार स्वीकारताच 15 ऑक्टोंबर ते 20 नोव्हेंबर पर्यंतआदर्श आचारसंहिता काळात जिल्हा पोलीस दलाने सहा कोटी 98 लाख 73 हजार 3002 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पो.अ. विश्व पानसरे यांचे नेतृत्वात बुलढाणा पोलिसांची जिल्ह्यात धडक कार्यवाही करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली सर्व
जिल्हातील सर्व पोलीस स्टेशन येथील हद्दीत हातभट्टीची दारु, अवैधदारु, अंमली पदार्थ, अवैध शस्त्र, नियमबाह्य कॅश या संबंधाने कार्यवाही करण्यात आली.
या करीता जिल्ह्यात विशेष नाकाबंदी, ऑपरेशन ऑल आऊट, सर्च ऑपरेशन या व इतर खबरदारीच्या प्रतिबंधक
उपाययोजना वेळोवेळी राबविण्यात येवुन 15/10/2024 पासून दि. 20/11/2024 या आदर्श आचार संहिता काळामध्ये बुलढाणा पोलीस दलाने एकूण सहा कोटी अठठ्यान्नव लाख त्र्याहत्तर हजार तीनशे दोन रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. सदर मुद्देमाल
हा सन 2014 विधानसभा मध्ये एक कोटी पासष्ट लाख चौपन्न हजार तीनशे अकरा रुपये, विधानसभा 2019 साली चौरेचाळीस लाख अठ्ठावीस हजार पाच रुपये, तर लोकसभा सन 2019 साली एकोणपन्नास लाख चार हजार आठशे अडोतीस रुपये, लोकसभा 2024 साली सासष्ट लाख व्यान्नव हजार दोनश पंधरा रुपये होता. तर सन 2024 विधानसभा मध्ये बुलढाणा पोलीस दलाने एकूण सहा कोटी अठ्ठयान्नव लाख त्र्याहत्तर हजार तीनशे दोन रुपयांचा मुद्देमाल हा सन 2014, 2019च्या
लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत अनेक पटींनी जास्त आहे.