Home भंडारा परभणी हत्याकांडाच्या निषेधार्थ भंडारा कडकडीत बंद व भव्य मोर्चा

परभणी हत्याकांडाच्या निषेधार्थ भंडारा कडकडीत बंद व भव्य मोर्चा

372
0

आशाताई बच्छाव

1001070176.jpg

परभणी हत्याकांडाच्या निषेधार्थ भंडारा कडकडीत बंद व भव्य मोर्चा

संविधान शिल्प यांची विटंबना करणाऱ्या वर राजद्रोह
व परभणी पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

 

जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री, प्रधानमंत्री यांना निवेदन सादर

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) आज दिनांक 21 डिसेंबर 2024 ला हुतात्मा स्मारक शास्त्री चौक भंडारा येथून परभणी हत्याकांड व दंगविरोधी कृती समिती भंडाराच्या वतीने भंडारा बंद व मोर्च्याचे आयोजन करण्यात आलेले होते. हा मोर्चा शांततेच्या मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील त्रिमूर्ती चौकात आल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले या मोर्चात हजारो स्त्री पुरुष सहभागी झाले होते. या मोर्चात मोर्चेकरांनी एकच साहेब बाबासाहेब, महाराष्ट्र शासन मुर्दाबाद ,सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे ,देवेंद्र फडवणीस मुर्दाबाद, निमका पेड कडवा है गृहमंत्री अमित शहा भडवा है ,तडीपार अमित शहा मुर्दाबाद ,सविधान जिंदाबाद अशा घोषणांनी भंडारा शहर दुमदुमले होते. याबाबत सविस्तर वृत्त असे की परभणी येथील संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर राजद्रोह व परभणी पोलिसांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून न्यायालयीन चौकशी करण्यात यावी. परभणी येथील भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेबांच्या पुतळा परिसरातील संविधान शिल्पाची विटंबना व अपमान करणाऱ्या समाजकंटकावर तसेच आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या मृत्यूस कारणीभूत पोलीस अधिकाऱ्यांचा कृतीचा निषेध व कारवाई म्हणून आज दिनांक 21 डिसेंबर 2024 ला परभणी हत्याकांड व दंगल विरोधी कृती समिती भंडारा तर्फे भंडारा बंद व निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते .परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बाबासाहेबांच्या पुतळा समोरील काचेच्या पेटीतील संविधानाच्या प्रतिकृतीची सायंकाळी 4/5 वाजेच्या दरम्यान एका समाजकंटकाने वितंबना केली. ही अपमान जनक घटना लोकांच्या लक्षात आल्यावर त्या समाजकंटकाला चोप दिला व पोलिसांच्या स्वाधीन केले .या घटनेच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी परभणी जिल्हा बंदची हाक दिली. दुपारपर्यंत बंद शांततेत पार पडला. परंतु दुपारनंतर काही असामाजिक तत्त्वांनी बंदला गालबोट लावून दुकानाची तोडफोड करीत हिंसाचार केला .पोलिसांनी त्यांना सोडून आंबेडकरी कार्यकर्त्यांची धरपकड करीत त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. पोलीस एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी सायंकाळी बौद्ध वस्तीत जाऊन निष्पाप लोकांना व महिलांना घरातून ओढून मारण करून कोंबिंग ऑपरेशन केले .बंद दरम्यान हिंसाचार व तोडफोड करणाऱ्या पोलिसांचे व समाजकंटकाचे चित्रीकरण करणाऱ्या निष्पाप कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी यांना बळजबरीने अटक करून पोलीस कोठडीत बेदम करून त्याचा खून केला .शांततेत आंदोलन करणाऱ्या विजय वाकोडे यांच्यावर एफ आय आर नोंदविला .पोलिसांकरवी होत असलेल्या मारहाण व मृत्यू च्या धसका घेतल्यामुळे वाकोडे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला .या दोन्ही भीमसैनिकांची मृत्यूस परभणी पोलीस जबाबदार आहेत. 10 डिसेंबरला सकल हिंदू परिवारातर्फे बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूवर होत असलेल्या अत्याचारा विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चात तोडफोडीचा आरोपी हा सहभागी होता .यावरून असे निदर्शनास येते की ,या मागचा सूत्रधार कोण वेगळाच व्यक्ती आहे .या सूत्रदाराचा शोध घेऊन त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई करण्यात यावी. दिनांक 16 डिसेंबर रोजी राज्यसभेत भारताचे गृहमंत्री यांनी आजकल एक फॅशन हो गई है आंबेडकर ,आंबेडकर ,आंबेडकर , आंबेडकर, आंबेडकर ,आंबेडकर नाम का घोस करने की इतनी बार किसी भगवान का नाम लेते तो साथ जन्म मे स्वर्ग मिल जाता .अशा प्रकारचे वक्तव्य करून बाबासाहेब यांचा घोर अपमान केला. आमच्याकरिता आंबेडकर फॅशन नसून आमच्यासाठी सर्व भगवान पेक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रेष्ठ आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अशा प्रकारे बाबासाहेबांबद्दल अपमान जनक वक्तव्य केल्यामुळे त्यांचा निषेध करून त्यांच्या राजीनामाची मागणी करण्यात आली. जिल्हाधिकारी यांच्या गैरउपस्थितीत नायब तहसीलदार सोनकुसरे यांच्यामार्फत मागण्यांचे निवेदन राष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले. . देण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये परभणीतील संविधान शिल्पाची तोडफोड करून संविधानाचा अपमान करणाऱ्या समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व त्याला कठोर शिक्षा करण्यात यावी, या घटनेतील मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, घटनेचे चित्रीकरण करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर सदस्य मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून योग्य चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी व नोकरीतून बरखास्त करण्यात यावे, आंबेडकरी कार्यकर्त्यावर लावलेले खोटे गुन्हे ताबडतोब मागे घेण्यात यावे, पोलिसांच्या कोंबिंग ऑपरेशनमुळे आंबेडकरी वस्त्यांचे प्रचंड नुकसान झाले त्यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावे, मृतक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची आर्थिक मदत करून त्यांच्या एका परिवारातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी सामावून घ्यावे, मृतक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला कारणीभूत सरद मरे अशोक घोरबंद व तुरनाल या पोलिस अधिकाऱ्याला ताबडतोब निलंबित करून चौकशीअंती कारवाई करावी, राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला .प्रधानमंत्री यांनी गृहमंत्री यांना मंत्रिमंडळातून तात्काळ बरखास्त करण्यात यावे , परभणीतील प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी,या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी अजय मेश्राम, आसित,बागडे ,विक्रांत भावसागर,विनय बनसोड, नितीन देशमुख, चंद्रशेखर खोब्रागडे ,माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे ,साहित्यिक अमृत बनसोड , विक्रांत भालाधरे,प्रेमानंद मेश्राम, संजीव भांबोरे ,अजित बनसोड, सुगत शेंडे ,सुरज डोंगरे, तथागत फुले ,सुरज भालाधरे,शरद खोब्रागडे, रूपचंद रामटेके ,श्रीकांत बनसोड, प्रफुल शेंडे ,हंसराज वैद्य , गोपाल शेलोकर ,भैय्याजी लांबट, डॉ.बाळकृष्ण सारवे, संजय मते,अजबराव चिचामे ,अशोक उईके , ज्ञानचंद,जांभुळकर ,राजेश मडामे ,दिलीप वानखेडे ,शिवदास गजभिये, प्रशांत सुखदेवे ,तुळशीराम गेडाम ,श्रीकांत भावसागर,विशाल नागदेवे ,विशाल खापर्डे ,शुभम नागदेवे ,विनय बनसोडे ,मोहित गडकरी ,अनिल फुलेकर ,राहुल रामटेके राजविदास गजभिये ,भीमराव टेंभुर्णे,अरुण गोंडाने, शुभम मडामे ,श्रीकृष्ण पडोळे, रत्नमाला वैद्य, युवराज उके ,दिलीप ढगे, सुहास गजभिये ,नासिक चवरे,अतुल लोणारे ,यशवंत वैद्य ,सुरेश मोटघरे, कन्हैया श्यामकुमार ,बजरंग देशपांडे, संजय रामटेके ,अभंग बोरकर ,राष्ट्रपाल नाईक, सुभाष गवई ,व भंडारा जिल्ह्यातील व शहरातील असंख्य महिला पुरुष या बंद व मोर्च्याच्या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांचा त्या प्रमाणात चोख बंदोबस्त होता

Previous articleविदर्भ, मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्राचा समतोल विकास साधणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Next articleमाहोरा येथील संजय गणपत काळे यांचे अल्पशा आजाराने निधन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here