आशाताई बच्छाव
ब्रेकिंग?टॅक्स न भरणे गाळेधारकांना अंगलट ! – कृषी उत्पन्न बाजार समितीतील 30 गाळे सील !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिपत्याखालील गाळ्यांवर आज मोठी कारवाई झाली. बांधकामाची परवानगी न घेणे, नोंदणी न करणे आणि विशेष म्हणजे टॅक्स न भरणे गाळेधारकांना अंगलट आले आहे. 30 गाळे सील केले असून, तब्बल 47 लाख रुपयांचा टॅक्स थकीत असल्याने ही कारवाई नगरपालिकेने केली आहे.
नगरपालिकेच्या हद्दीत कृषी उत्पन्न बाजार समितीतील गाळे बांधण्यात आले आहे. 51 जुने गाळे तर 36 नवीन
गाळे बांधण्यात आले. गाळेधारकांनी रीतसर नगरपालिकेची नोंदणी करणे आवश्यक आहे शिवाय बांधकामाची परवानगी घेणे आवश्यक आहे परंतु नगरपालिकेच्या नियमाला बगल देऊन गाळेधारक आपल्या मर्जीत वागत होते. दरम्यान नगरपालिकाचे सीओ पांडे यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईत
कृषी उत्पन्न बाजार समितीमधील 30 गाळे सील करण्यात आले. तर उर्वरित गाळेधारकांना नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील गुरुवारपर्यंत 47 लाख रुपयांची थकीत रक्कम अर्थात टॅक्स यांना भरावा लागणार आहे. त्यामुळे नगरपालिकेचे कारवाईची गाळधारकांनी धास्ती धरली आहे.