आशाताई बच्छाव
रोझे ग्रामसेविका बदली प्रकरण,चार महिन्यांचा संघर्ष व लढा आणि अपघात….!
(राजेंद्र पाटील राऊत)
मालेगाव:-रोझे,ता.मालेगांव येथील वादग्रस्त ग्रामसेविका श्रीमती सुवर्णा कडू सांळुखे यांच्या बदलीसाठी युवा मराठा महासंघाने चार महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या संघर्षाला व लढ्याला अखेर यश आले असले, तरी या चार महिन्यांच्या कार्यकाळात आलेल्या विविध अडचणीचा व संकटाचा सामना करीत शेवटी ग्रामसेविका सुवर्णा सांळुखे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली हि बाब समाधानकारक म्हटली गेली पाहिजे.
मालेगाव तालुक्यातील प्रत्येक गावात आपल्या कर्तृत्वाने वादग्रस्त ठरलेल्या ग्रामसेविका श्रीमती सुवर्णा कडू सांळुखे यांची व-हाणे प्रकरणात तडकाफडकी अन्यत्र बदली करण्यात आली.मालेगाव जवळील रोझे या गावी नियुक्ती दिल्यावर सुध्दा ग्रामसेविका सुवर्णा सांळुखे यांनी आपल्या मनमानी व हिटलरशाही पध्दतीचा कारभार सुरूच ठेवला,गावात कुठलेही विकासकामे करायची नाहीत.आदिवासी महिला सरपंच सौ.सुमनताई अभिमन्यू गायकवाड यांना कधीच विश्वासात घ्यायचे नाही.सरपंचाचे फोन उचलायचे नाहीत.रोझे गावी महिनोन्महिने जायचं नाही.आदिवासी महिला सरपंच असल्याने अवमानकारक वागणूक देणे.उपसरपंच नामदेव उगले यांच्यावर गंभीर स्वरूपाचे खोटे नाटे आरोप करणे यापेक्षा वेगळी कारकीर्द सुवर्णा सांळुखे यांची रोझे ग्रामस्थांना बघावयास मिळाली नाही.त्रस्त झालेल्या सरपंच उपसरपंच यांनी युवा मराठा महासंघाच्या नेतृत्वाखाली सप्टेंबर २०२४ मध्ये मालेगाव पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली खरी,पण… फक्त कागदोपत्री घोडे नाचवून “होईल ना बदली”या मोघम उत्तराने सरपंच उपसरपंच व युवा मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत यांची वारंवार बोळवण करुन सुवर्णा सांळुखे यांना पाठीशी घालण्यासाठी विस्तार अधिकारी गुलाब राजबन्शी यांनी मोलाची कामगिरी बजावली.अखेर रोझे ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप ठोकण्यात आले, तरीदेखील मुर्दाड प्रशासनाला घाम फुटला नाही हे विशेष! अखेर युवा मराठा महासंघाच्या नेतृत्वाखाली संपूर्ण रोझे ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन घेऊन व वरिष्ठांकडे खोटे अहवाल सादर करणा-या विस्तार अधिकारी राजबन्शी यांचा दिनांक २ डिसेंबर २०२४ रोजी जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग वर्षा फडोळ यांच्या समोर पर्दाफाश करण्यात आल्यावर,फडोळ यांनी दोन दिवसाचा अवधी सरपंच सौ सुमनताई गायकवाड उपसरपंच नामदेवराव उगले व युवा मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत यांच्याकडे मागून घेतला ही तेवढी समाधानाची बाब ठरली.आणि त्याच दिवशी नाशिकहून मालेगावकडे परत येत असताना वाके फाट्याजवळ राजेंद्र पाटील राऊत यांचा अँक्सीडेट झाला.पायाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली.मात्र वादग्रस्त ग्रामसेविका सुवर्णा सांळुखे यांची दिनांक ४ डिसेंबर रोजी अखेर तडकाफडकी बदली झाल्याचे समाधान शब्दात मांडता येणार नाही.अखेर चार महिन्यांच्या लढ्याला, संघर्षाला यश मिळाले, हे महत्त्वाचं.रोझे वासियांनी युवा मराठा महासंघाचे खुप खुप कौतुक करुन अभिनंदन केले.
लढा अजून संपलेला नाही
युवा मराठा महासंघाचा वादग्रस्त ग्रामसेविका सुवर्णा सांळुखे यांच्या विरोधातील लढा अजून संपलेला नाही.व-हाणे गावात स्वतः च्या पदाचा गैरवापर करून अनेक बेकायदेशीर कामे करुन शासनाला फसविले असल्याने,त्या विरोधातही विभागीय आयुक्त डॉ.प्रविण गेडाम यांच्या दरबारात ग्रामसेविका सुवर्णा सांळुखे यांच्यावर बडतर्फची टांगती तलवार लटकलीच आहे.युवा मराठा महासंघ हि लढाई अखेरच्या क्षणापर्यंत लढत राहून व-हाणेतील कारकिर्दीतील केलेल्या सगळ्याच बेकायदेशीर कामांना चव्हाट्यावर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही एव्हढे मात्र निश्चित!