आशाताई बच्छाव
अधिष्ठान सामाजिक संस्थेच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांना अल्पोपहार व अन्न वाटप
मुंबई : ( विजय पवार प्रतिनिधी )
विश्वभूषण महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रति वर्षी प्रमाणे याही वर्षी संस्थेच्या वतीने अभिवादन करण्याकरिता येणाऱ्या सर्व अनुयायांना अल्पोपहार व अन्नवाटप छत्रपती शिवाजी पार्क दादर येथे करण्यात आले.
वरील कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष: ॲड. अनार्य पवार, सचिव: बाबुराव बुद्रुक, खजिनदार विजय कांबळे, सदस्य: जयश्रीताई ओव्हाळ ,धनंजय वायंगणकर ,नितीन वाघमारे, जयवंत तांबे, प्रसाद संकपाळ, विजय पवार, पार्थ पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.