आशाताई बच्छाव
डॉ. काकासाहेब पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालयातीलह बेकायदा भरती व गैरकारभार उघड
भैय्यासाहेब मोरे यांच्या संघर्षाला यश; मुख्याध्यापकांचे वेतन स्थगित
चाळीसगाव, प्रतिनिधी विजय पाटील: डॉ. काकासाहेब पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालय, चाळीसगाव येथील बेकायदेशीर कर्मचारी भरती व बिंदूनामावलीतील फेरफार प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. या प्रकरणात संस्थेने शासनाची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप आहे.
भैय्यासाहेब मोरे यांनी या अन्यायाविरुद्ध शिक्षण उपसंचालक, नाशिक यांच्याकडे पुराव्यांसह न्याय मागितला. त्यानंतर संबंधित उपसंचालकांनी चौकशी करून बेकायदा व बॅकडेटेड नियुक्त करण्यात आलेल्या 16 कर्मचाऱ्यांना निलंबित केले.
दरम्यान, बिंदूनामावलीतील गंभीर प्रकरण राज्य मागासवर्गीय आयोगाच्या निदर्शनास आले. बिंदू नामावली कार्यालयाने माध्यमिक शिक्षणाधिकारी जळगाव यांनी तातडीने चौकशीसाठी संबंधित शाळेला माहिती मागितली. शाळेने याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केली
यासंदर्भात शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी मुख्याध्यापकांना बिंदूनामावलीतील तफावत बाबतीत नोटीस बजावली असून, सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत मुख्याध्यापकांचे वेतन स्थगित करण्यात आले आहे.
भैय्यासाहेब मोरे यांचा लढा सुरूच
भैय्यासाहेब मोरे यांनी स्पष्ट केले की, “मी मागासवर्गीय कर्मचारी आहे मी या अन्यायाविरुद्ध सनदशीर मार्गाने लढत राहणार आहे. शाळेतील अजूनही अनेक भ्रष्ट कारभारांची मी लवकरच पुराव्यानिशी उकल करणार आहे.”
या प्रकरणामुळे शाळेच्या व्यवस्थापनातील अनेक अनियमितता समोर येत असून, लवकरच आणखी कारवाई होण्याची शक्यता आहे.