आशाताई बच्छाव
वैशाली बुद्ध विहार व सुबोध बुद्ध विहार अड्याळ येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) आज दिनांक 6 डिसेंबर 2024 सायंकाळी 7 वाजता वैशाली बुद्ध विहार व सुबोध बुद्ध विहार बाजारपेठ अड्याळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 68 वा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला .यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षपदी डॉ. गणेश मेश्राम होते. तर प्रमुख अतिथी म्हणून ठाणेदार धनंजय पाटील ,शिवशंकर मुंगाटे सरपंच, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, ग्रामविकास अधिकारी हिरालाल खंडाईत चिचाळ ,तंटामुक्त समिती अध्यक्ष नरेंद्र अंबादे, माझी तंटामुक्त समिती अध्यक्ष नितीन वरंटीवार ,अर्जुन जनबंधू ,ग्रामपंचायत सदस्य आशिष अंबादे ,यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते . यावेळी सर्व पाहुणे मंडळींच्या उपस्थितीत महाकारूणी तथागत गौतम बुद्ध व विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला प्रथम अभिवादन करून माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे संचालन माजी सरपंच मुनेश्वर बोदलकर यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत सदस्य विकास टेंभुर्णे यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता वसुश्री टेंभुर्णे, सृष्टी टेंभुर्णे, साधना कासारे ,मंदिरा कोचे ,नलुबाई कराडे,
, दिनेश्वरी वानखेडे ,मीनाताई शहारे ,महादेव कोचे ,निर्भयीसाखरे व गावातील सर्व बुद्ध उपासक उपासक यांनी सहकार्य केले