आशाताई बच्छाव
कलश सिड्स कंपनीकडून ग्रामपंचायतीच्या सार्वजनीक विहीरीजवळ दुसरी विहीर खोदण्याचा प्रयत्न; गावकर्यांचा तिव्र विरोध
जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ -तालुक्यातील गोलापांगरी येथील गावकर्यांना पाणी पुरवठा करणार्या सार्वजनिक विहीरीजवळ कलश या खाजगी कंपनीने विहीर खोदून पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताला बाधा निर्माण केल्याने गावकर्यांनी त्या विहीरीला तिव्र विरोध केलाय. त्यामुळे गावकर्यांनी गुरुवार दि. 5 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 1 वाजता निवासी उप जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलंय.
गोलापांगरी येथील गावकर्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी एक सार्वजनी विहीर असून त्या विहीरी शेजारीच कशल सिड्स या खाजगी कंपनीने शेतजमीन खरेदी करुन त्यात विहीर खोदण्यास सुरुवात केली. त्या विहीरीमुळे सार्वजनीक विहीरीच्या पाण्यावर परिणाम होत असल्याचे गावकर्यांनी म्हटलंय. सदरील विहीरीचे काम थांबविण्यात यावे यासाठी ग्रामपंचायतीने विरोध केला असून जिल्हा प्रशासनाला या पुर्वीच पत्र दिले होते. तरीही कंपनीकडून विहीर खोदण्याचा प्रयत्न सुरुच आहे. कलश सिड्स कंपनीने ग्रामपंचायत आणि गावकर्यांनाही जुमानले नसल्याचे तक्रारीत म्हटलंय. कलश सिड्स कंपनीने विहीर खोदून गावकर्यांच्या पिण्याच्या पाण्यास बाधा निर्माण केल्याने ग्रामपंचायत आणि गावकर्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून खाजगी कंपनीच्या विहीरीचे काम रोखण्याची मागणी केली.
यावेळी सरपंच आसराबाई खडेकर, संतोष खडेकर, विनोद खरात, मन्सुर पठाण, अरुण जाधव, रामेश्वर जर्हाड, रुपेश उमप, अन्वर शेख यांच्यासह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.