आशाताई बच्छाव
मराठवाडा ग्रामीण विकास संस्था लिंक वर्कर प्रकल्प अंतर्गत व आयसी टीसी सेंटर सोयगाव व प्राथमिक आरोग्य केंद्र उंडणगाव यांच्या विद्यमाने एचआयव्ही तपासणी कॅम्प संपन्न.
प्रतिनिधी जालना-वसंतराव देशमुख
दिनांक 05/12/2024
याविषयी सविस्तर माहिती अशी की,
आज दिनांक. 5/12/2024.रोजी
उंडणगाव येथे मराठवाडा ग्रामीण विकास संस्था लिंक वर्कर प्रकल्पांतर्गत व आयसीटीसी सेंटर सोयगाव व प्राथमिक आरोग्य केंद्र उंडणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने एच आय व्ही तपासणी कॅम्प घेण्यात आला. हा कॅम्प प्रकल्प संचालक आप्पासाहेब पाटील उगले डी. आर. पी . अन्नपूर्णा ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याच्या जिल्हा एड्स नियंत्रण विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी साधना गंगावणे व डॉ. दिनाजी खंदारे वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय सोयगाव / अजिंठा यांच्या सहकार्यातून व नियोजनातून या कॅम्प मध्ये एकुण 53. लोकांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली. यात उपस्थित लोकांना लिंक वर्कर अरुण चव्हाण देशमुख यांनी एच आय व्ही एड्स विषयी माहिती दिली तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ सोनाली चौधरी यांनी लोकांची एचआयव्ही तपासणी केली.डॉ.अनिल धनवट यांनी उपस्थित लोकांचे आरोग्य तपासणी केली तर सुनील वानखेडे कौन्सिलर यांनी उपस्थित गरोदर मातांना एच आय व्ही एड्स विषयी माहिती दिली. डॉ. शुभम माने यांनी उपस्थित लोकांची आरएमसी तपासणी केली. तसेच विशाल पडवळ सुपरवायझर यांनी उपस्थित लोकांना लिंक वर्कर प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली. या कॅम्प मध्ये उपस्थित कर्मचारी प्रवीण उर्फ अविनाश दसरे, आरोग्य सेवक एम डी धनई आरोग्य सेवक सारंग चव्हाण, आरोग्य सेवक शितल फोलाने, सिस्टर पी पी जैस्वाल, सिस्टर बी एस कुंटे, एच ए जे. डी. शिरसाट, चेतन माहोर व इतर कर्मचारी उपस्थित होते.