आशाताई बच्छाव
राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धासाठी महाराष्ट्र
संघात अमृता सोपान शिंदे हिची निवड
बदनापूर, दि. २८(प्रतिनिधी दिलीप बोंडे)- नुकताच २५ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत
जिल्हा क्रीडा संकुल बारामती, जि पुणे येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय
शालेय बेसबॉल स्पर्धा व निवड चाचणीमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागाची
अमृता सोपान शिंदे हिने उत्कृष्ट खेळी करत महाराष्ट्र संघात स्थान
पटकाविले आहे.
अमृताने यापूर्वी १४ वर्षे वयोगटात असतांना मध्यप्रदेश येथे मागील २०२३
-२४ मध्ये १७ वर्षे वयोगटात छत्तीसगड येथील राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी
होऊन उत्कृष्ट खेळी केली होती. या वर्षेही १९ वर्षे वयोगटात आपले स्थान
महाराष्ट्र संघात कायम ठेवले आहे. या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी
संजय गाढवे, जालना जिल्हा बेसबॉल असोशियशनचे अध्यक्ष निवृत्ती दिवटे,
सचिव एकनाथ सुरुशे, कोषाध्यक्ष प्रमोद खरात व पदाधिकारी यांच्यासह जिजाऊ
ज्युनिअर कॉलेज सेलगावचे अध्यक्ष गजानन वाळके,प्राचार्य पवार यांनी
अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहे.
००००००००००
फोटो ओळी….
७- राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धासाठी महाराष्ट्र संघात अमृता सोपान
शिंदे हिची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.