Home बीड बीडमध्ये डॉ. योगेश क्षीरसागरच बाजीगर ठरले; मुंडे बंधू – भगिनींनी केले प्रयत्न

बीडमध्ये डॉ. योगेश क्षीरसागरच बाजीगर ठरले; मुंडे बंधू – भगिनींनी केले प्रयत्न

231

आशाताई बच्छाव

1000902533.jpg

बीडमध्ये डॉ. योगेश क्षीरसागरच बाजीगर ठरले; मुंडे बंधू – भगिनींनी केले प्रयत्न

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड दि: २९ ऑक्टोंबर २०२४ बीड विधानसभा निवडणुकीसाठी डॉ. योगेश क्षीरसागर हे कसे नायक आणि लायक उमेदवार आहेत हे पटवून देण्याचे काम पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी महायुतींच्या नेत्यांसमोर अत्यंत उत्कृष्टपणे मांडले. शिवाय मतदार संघातील राजकारण आणि सामाजिक परिस्थिती या कसोटीवर डॉ योगेश क्षीरसागर कसे फायद्याचे उमेदवार ठरतात. हे त्यांनी वरिष्ठांना पटवून दिले. डॉ. योगेश क्षीरसागर हे ओबीसी प्रवर्गमधून येतात मात्र त्यांच्यासोबत काम करणारे सर्वच कार्यकर्ते हे सर्वच जाती धर्मतील आहेत. डॉ योगेश क्षीरसागर हे कधीच धर्मभेद, जातिभेद असं काही पाळीत नाहीत. मुस्लिम आणि दलित समाजही त्यांच्या बाजूने भक्कमपणे उभा आहे. ही सगळी गणिते लक्षात आल्यानंतरच डॉ. योगेश क्षीरसागर यांची धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी शिफारस केली. आणि त्यांच्या या शिफारशीचा डॉ. योगेश क्षीरसागर यांना मोठा फायदा झाल्याचे दिसते.