Home बुलढाणा रावण आणि बकासुर पाहिलेत का ? -अशाने विजयादशमी कशी साजरी होईल ?...

रावण आणि बकासुर पाहिलेत का ? -अशाने विजयादशमी कशी साजरी होईल ? – सार्वजनिक बांधकाम विभागात कंत्राटदाराच्या पैशांवर डल्ला? -खोटे गुन्हे दाखल करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप !

19
0

आशाताई बच्छाव

1000841878.jpg

रावण आणि बकासुर पाहिलेत का ? -अशाने विजयादशमी कशी साजरी होईल ? – सार्वजनिक बांधकाम विभागात कंत्राटदाराच्या पैशांवर डल्ला? -खोटे गुन्हे दाखल करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलढाणा अधिकार आणि खुर्चीचा अहंकार असलेले अनेक रावण शासकीय कार्यालयात वावरताहेत तर काही बकासूर गलेलठ्ठ पगार घेऊनही कर्तव्यात कसूर करून फुकटाचा पैसा गिळंकृत करताहेत. एखाद्याने आवाज बुलंद केला तर त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवून साम-दाम-दंड-भेद वापरून घाबरविल्या जाते. त्यामुळे असत्यावर सत्याचा विजय दुरापास्त झाला असून खऱ्या अर्थाने विजय दशमी केव्हा साजरी होणार? असा प्रश्न एका कंत्राटदाराच्या
आरोपावरून निर्माण झालाय.

बुलढाणा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातील 4 अधिकाऱ्यांनी एका कंत्राटदाराचे टेंडर पास केले परंतु अर्धा पैसा देऊन उर्वरित पैसा देण्यासाठी डावललेच नाही तर खोटे गुन्हे दाखल करून जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिल्याचा आरोप पीडित कंत्राटदाराने केलाय. गणेश रामधन शिंदे असे पीडित कंत्राटदाराचे नाव आहे. त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने 2022 ला झेरॉक्सचे टेंडर मिळाले होते. शिंदे यांना सुरुवातीला पैसे मिळाले परंतु मार्च महिन्यापासूनची त्यांची 4 ते साडेचार लाखांची बिलं थकीत आहे. कार्यालयाच्या वारंवार
वाऱ्या करुनही आणि विनंत्या करून देखील काढण्यासाठी टाळाटाळ करीत असल्यामुळे पीडित तक्रारदार गणेश शिंदे यांनी

सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात माहितीचा अधिकार टाकून कार्यालयातील कामे व बिले याबाबतची माहिती मागितली होती. परंतु त्यांच्या माहितीच्या अधिकाराला केराची टोपली दाखविण्यात आली. उलट

त्यांच्यावर कनिष्ठ अभियंता सुभाष राऊत, लिपिक प्रभू गारोळे, एल ओ चव्हाण, बिजवे मॅडम भंडारपाल यांनी पोलिस ठाण्यात खोटे गुन्हे दाखल करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप गणेश शिंदे यांनी ‘ युवा मराठा’कडे ऑन कॅमेरा केला आहे. त्यामुळे वरिष्ठांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Previous articleचिमुकल्यांनी खेळायला नेलेल्या ब्रिझा कारचा विचित्र अपघात !
Next articleसमृद्धीवर’ झोपेची डुलकी ! – अपघातात 3 जण जखमी !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here